आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोमवार : काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरू शकते ग्रहस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व लोकांसाठी सोमवारची ग्रहस्थिती शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे प्रभाव टाकेल. सोमवारी वार आणि नक्षत्राच्या संयोगाने मानस नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा शुभ योग सोमवारी चंद्र अनुराधा नक्षत्रामध्ये असल्यामुळे जुळून आला आहे. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. या शुभ योगाच्या प्रभावाने पैशाशी संबंधित कार्य पूर्ण होतील.सूर्य आणि चंद्राच्या स्थितीमुळे प्रीती नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. हा योगही दिवसभर राहील. या योगाच्या प्रभावाने अडकलेला पैसा परत मिळेल.

सोमवारी ग्रहांची अशुभ स्थिती जुळून येत आहे. तूळ राशीमध्ये शनि आणि वृश्चिक राशीचा मंगळ दोन्ही शत्रू ग्रह द्विर्द्वादश नावाचा अशुभ योग तयार करत आहेत. या योगामुळे काही राशीच्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, संपूर्ण राशिभविष्य....
( येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)