आज जुळून येणारे अशुभ योग अनेक राशींना प्रभावित करतील. चंद्र आज संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत रेवती नक्षत्रामध्ये असल्यामुळे उत्पात नावाचा अशुभ योग तयार होईल. हा योग सूर्योदयापासून सुरु होऊन दिवसभर राहील. याचा अशुभ प्रभाव याच्या नावानुसारच असेल. या योगाच्या प्रभावामुळे आज काही लोकांना विनाकारण वादाला सामोरे जावे लागू शकते.
या व्यतिरिक्त आज सूर्य आणि शनीचा द्विर्द्वादश योगही जुळून येत आहे. हा अशुभ योगही वाद आणि तणाव निर्माण करणारा ठरू शकतो कारण शनि आणि सूर्य एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. आज शनि आणि मंगळही एकमेकांपासून दुसर्या आणि बाराव्या राशीत आहेत. ही ग्रहस्थिती धनहानी आणि नुकसानीचा संकेत देत आहे. आज चंद्र मीन राशीत केतुसोबत असून यावर राहूची पूर्ण दृष्टी पडत आहे. ही ग्रहस्थिती ग्रहण योग तयार करत आहे. एकंदरीत गोचरमध्ये जवळपास सर्व ग्रह चांगल्या स्थितीमध्ये नाहीत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आजची ग्रहस्थिती आणि नक्षत्र कोणत्या राशीवर कसा प्रभाव टाकत आहे...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)