आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 To 10 January 2016 Weekly Horoscope In Marathi

4 ते 10 जानेवारी : कोणत्या राशीसाठी कसे राहतील हे 7 दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या वर्षाचा पहिला आठवडा ग्रहण योगाने सुरू होत असल्यामुळे काही लोकांसाठी हे सात दिवस त्रासदायक तर काहींसाठी आनंद देणारे ठरू शकतात. शुक्रवारी राहू-केतू राशी बदलून क्रमश: सिंह व कुंभ राशीत प्रवेश करतील. कन्या व मीन यातून मुक्त होतील. एकंदरीत हा आठवडा संमिश्र फळ देणारा राहील.

मेष
राशिस्वामी मंगळाची दृष्टी आहे. चंद्राचे गोचर सर्व प्रकारे अनुकूल आहे. धनाची आवक चांगली राहणार व कोणत्याही संकटाची शक्यता नाही. कुटुंबातील मतभेद संपतील. आठवड्याच्या अखेरीस चंद्र अष्टमात असल्याने खर्च अधिक होईल व वाईट वार्ता मिळण्याची शक्यता आहे.

नोकरी- व्यापार - नवी कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील.
शिक्षण - शिक्षक नाराज राहू शकतात. विद्यार्जनातील विघ्ने संपतील.
आरोग्य - घशात संसर्ग संभवतो. दातदुखीची शक्यता.
प्रेम - प्रेमात निराशा व वैवाहिक जोडीदारासाठी वेळ मिळणार नाही.
करण्याजोगे - सूर्याला दुग्धमिश्रित पाणी अर्पण करा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, नववर्षातील पहिला आठवडा कसा राहील तुमच्यासाठी....