आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राशिभविष्य : जाणून घ्या, चंद्र-मंगळाचा योग किती लोकांसाठी ठरू शकतो शुभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार म्हणजे आज मंगळ आणि चंद्रामुळे द्विद्वार्दश योग जुळून येत आहे. हा योग काही राशीच्या लोकांसाठी शुभ तर काही राशीसाठी अशुभ ठरू शकतो. आज मंगळ ग्रहाने रास बदलली आहे. मंगळ रास बदलून तूळ राशीत आला आहे. आज चंद्र धनु राशीमध्ये आहे. मंगळापासून चंद्र दुसऱ्या आणि चंद्रापासून मंगळ बाराव्या राशीत स्थित आहे. ही स्थिती द्विद्वार्दश योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांना अडकलेला पैसा परत मिळण्याची किंवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

या योगाच्या अशुभ प्रभावाने काही राशीच्या लोकांना वादामध्ये पडावे लागू शकते. या योगाच्या प्रभावाने अपघात किंवा एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढे राशीनुसार जाणून घ्या, कोणत्या लोकांनी आज सावध राहणे गरजेचे आहे.

आजची ग्रहस्थिती -
कर्क राशीमध्ये गुरु आहे. सिंह राशीमध्ये सूर्य आणि शुक्र आहेत. कन्या राशीमध्ये बुध आणि राहू आहेत. तूळ राशीमध्ये शनी एकटाच आहे. वृश्चिक राशीमध्ये मंगळ आहे. धनु राशीमध्ये चंद्र तर केतु मीन राशीत आहेत.

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)