आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तरेषा : हातावर त्रिशूळ तयार झाल्यास समजावे होणार आहे भाग्योदय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये विविध विद्या सांगण्यात आल्या असून याच्या माध्यमातून शुभ-अशुभ घटनांची माहिती मिळू शकते. ज्योतिषाच्या या खास विद्यांमधील एक आहे हस्तरेषा विद्या. हस्तरेषा ज्योतिषमध्ये हातावरील रेषांची बनावट पाहून भविष्यवाणी केली जाऊ शकते. उज्जैनचे हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार हातावर छोट्या-छोट्या रेषांपासून काही चिन्ह तयार होतात, जे व्यक्तीचे सौभाग्य वाढवतात. ज्या लोकांच्या हातावर हे शुभ चिन्ह तयार होतात त्यांना आयुष्यात सुख-सुविधा, मान-सन्मान प्राप्त होतो. असेच एक शुभ चिन्ह त्रिशूळ आहे.


1. शुक्र पर्वतावर त्रिशूळ असल्यास व्यक्तीला जीवनात खरे प्रेम मिळू शकते. असा व्यक्ती इतरांच्या भावना समजून घेणारा असतो. शुक्र पर्वत अंगठ्याच्या ठीक खाली असतो.


2. एखाद्या व्यक्तीच्या हातावर मंगळ पर्वतावर त्रिशूळ असल्यास तो खूप कष्ट केल्यानंतर धनवान बनतो. मंगळ पर्वत हातावर दोन ठिकाणी असतो. एक मंगळ पर्वत गुरु आणि शुक्र पर्वताच्या मध्ये असतो तर दुसरा चार आणि बुध पर्वताच्या मध्ये असतो.


3. चंद्र पर्वतावर त्रिशूळ असल्यास व्यक्ती कल्पनाशील आणि रचनात्मक होतो. हा पर्वत अंगठा आणि शुक्र पर्वताच्या ठीक समोर हाताच्या दुसऱ्या बाजूला असतो.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर काही खास गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...