आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलीत शनी-चंद्राचा हा योग असल्यास असा व्यक्ती नेहमी गरीबच राहतो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार, जन्म कुंडलीत ग्रहांच्या स्थितीमुळे व्यक्तीला जीवनात यश आणि अपयश प्राप्त होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जन्म कुंडलीत ग्रहांचे काही योग असे तयार होतात ज्यामुळे व्यक्ती नेहमी गरीब राहतो. असाच एक योग आहे विषयोग.


कसा तयार होतो विष योग
एखाद्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीत चंद्र आणि शनी एकाच स्थानात असल्यास विष योग तयार होतो. हा योग त्या व्यक्तीसाठी अत्यंत दुर्भाग्यशाली मानला जातो. या योगामुळे आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.


कुंडलीतील कोणत्या स्थानामध्ये कसा राहतो विष योगाचा प्रभाव 
1. कुंडलीतील लग्न म्हणजेच पहिल्या स्थानात विष योग असल्यास व्यक्तीला आयुष्यभर कोणत्या न कोणत्या आजाराला सामोरे जावे 

लागते.
2. कुंडलाईतील द्वितीय स्थानामध्ये विष योग असल्यास व्यक्तीला आयुष्यभर पैसा कमी पडतो.
3. तिसऱ्या स्थानात विष योग असल्यास कष्ट करूनही व्यक्तीला काहीही मिळत नाही.
4. चौथ्या स्थानात विष योग असल्यास अपत्य सुख मिळत नाही.
5. सहाव्या स्थानामध्ये विष योग असल्यास शत्रू आणि कर्ज वाढत राहते.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, कुंडलीतील इतर स्थानामध्ये विष योगाचा कसा राहतो प्रभाव...

बातम्या आणखी आहेत...