Home | Jeevan Mantra | Jyotish | Hasta Rekha | Palm Reading About Little Finger In marathi

स्त्री असो वा पुरुष, करंगळी पाहून लगेच समजू शकतात या 15 गोष्टी

रिलिजन डेस्क | Update - Apr 22, 2018, 01:34 PM IST

हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार करंगळीसुद्धा स्वभाव आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगते. करंगळीची

 • Palm Reading About Little Finger In marathi

  हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार करंगळीसुद्धा स्वभाव आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगते. करंगळीची लांबी, उंची आणि यावर तयार झालेल्या वेगवेगळ्या रेषा, चिन्हांचा अभ्यास केला जातो. या छोट्या-छोट्या संकेतांवरून व्यक्तीच्या स्वभाव आणि भविष्याविषयी समजू शकते.


  1. जर करंगळी चांगल्या स्थितीमध्ये, सुंदर, लांब असेल तर असा व्यक्ती इतरांना लवकर प्रभावित करतो.
  2. ज्या लोकांची करंगळी पुढील भागात टोकदार असते, ते बुद्धिमान असतात. अशा लोकांची बुद्धी तल्लख असते.
  3. करंगळी सामान्य लांबीपेक्षा जास्त लांब असेल तर व्यक्ती जास्त चतुर असतो. हे लोक आपल्या चातुर्याने कामामध्ये यश प्राप्त करतात.


  करंगळीशी संबंधित इतर काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 • Palm Reading About Little Finger In marathi

  4. ज्या लोकांच्या हातावरील करंगळीची लांबी सामान्य असते, अशा लोकांना कुटुंबात, समाजात योग्य मान-सन्मान मिळतो.आपल्या योग्यतेच्या जोरावर प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करतात.
  5. करंगळी सामान्य लांबीपेक्षा जास्त छोटी असेल तर व्यक्ती कोणतीही गोष्ट समजून घेण्यास असमर्थ असतो.
  6. जर करंगळीचा शेवटचा भाग चौकौनी असेल तर असे लोक दूरदृष्टी ठेवणारे असतात. हे लोक विलक्षण प्रतिभेचे धनी असतात.

 • Palm Reading About Little Finger In marathi

  7. ज्या लोकांची करंगळी दिसायला सुंदर असते ते लोक सर्वगुण संपन्न असतात.
  8. ज्या लोकांची करंगळी वाकडी असते, असे लोक जीवनात अनेकवेळा अयोग्य ठरतात. हे लोक कोणतेही काम व्यवस्थित करू शकत नाहीत.
  9. जर एखाद्या व्यक्तीच्या हातावरील करंगळी आणि अनामिका बोट एकसमान असतील तर असा व्यक्ती राजकारणात प्रभावी राहतो.

 • Palm Reading About Little Finger In marathi

  10. जर करंगळी, अनामिका बोटाकडे झुकलेली असेल तर व्यक्ती चांगला व्यापारी होतो.
  11. ज्या लोकांच्या करंगळी आणि अनामिका बोटामध्ये जास्त अंतर असते, अशा लोकांना स्वच्छंदी काम करायला आवडते.
  12. जर हातावरील करंगळी सामान्य लांबीपेक्षा छोटी असेल तर असा व्यक्ती घाईगडबडीत काम करणारा असतो.
  13. जर एखाद्या व्यक्तीच्या करंगळीवरील पहिला भाग (बोटाच्या वरचा) जास्त लांब असेल तर असा व्यक्ती जास्त बडबड करणारा असतो.

 • Palm Reading About Little Finger In marathi

  14. करंगळीचा दुसरा भाग (बोटाच्या मधला) जास्त लांब असेल तर व्यक्ती चतुर असतो.
  15. जर करंगळीच्या शेवटचा भाग (बोटाच्या शेवटचा) जास्त लांब असेल तर व्यक्ती वस्तू खरेदी करण्यात हुशार असतो.

Trending