आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातावरील शुभ संकेत : एकही असल्यास समजावे तुमचा होणार आहे भाग्योदय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये भविष्य जाणून घेण्यासाठी विविध विद्या सांगण्यात आल्या आहेत. यामधील एक आहे हस्तरेषा विद्या. यामध्ये हाताची बनावट आणि हातावरील रेषा पाहून भविष्यवाणी केली जाते. हातावरील काही असे शुभ संकेत असतात ज्यामुळे व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, राजयोग सांगणारे हातावरील काही शुभ संकेत...


1. तळहातावर धनुष्य, चक्र, माळ, कमळ, झेंड्यासारखे शुभ चिन्ह असल्यास व्यक्तीला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. हे लोक जीवनात धनलाभ प्राप्त करतात.


2. एखाद्या व्यक्तीच्या हातावर मध्यभागी घोडा, कलश किंवा झाडाचे चिन्ह असेल तर जीवनात त्याला सर्व सुख-सुविधा मिळतात आणि आर्थिक लाभही होतात.


3. हातावर मासा, छत्री, अंकुश, वीणा किंवा हत्तीचे चिन्ह असेल तर व्यक्ती मान-सन्मानाने पैसे कमावतो आणि सर्व सुख प्राप्त करतो.


4. ज्या लोकांच्या हातावर तलवार, पर्वत किंवा नांगराचे चिन्ह असते, तो व्यक्ती प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करतो. यांच्याजवळ पैशांची कमी नसते.


5. हातावर त्रिशूळचे चिन्ह असल्यास हासुद्धा एक शुभ संकेत मानला जातो. या शुभ चिन्हामुळे व्यक्तीला कमी कष्टामध्ये जास्त यश प्राप्त होते.


लक्षात ठेवा, हातावरील रेषांमध्ये इतर दोष असल्यास येथे सांगण्यात आलेल्या शुभ संकेतांचे प्रभाव बदलू शकतात. दोन्ही हातावरील रेषांचा अभ्यास करूनच अचूक भविष्यवाणी केली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...