हस्तरेषेचे 4 संकेत सांगतात, तुमच्याकडे पैसा येणार परंतु टिकणार नाही
अनेक लोक जीवनात भरपूर पैसा कमावतात परंतु त्यांच्याजवळ पैसा टिकून राहत नाही. या संदर्भात हस्तरेषा
-
अनेक लोक जीवनात भरपूर पैसा कमावतात परंतु त्यांच्याजवळ पैसा टिकून राहत नाही. या संदर्भात हस्तरेषा शास्त्रामध्ये काही खास संकेत सांगण्यात आले आहेत. हे संकेत लक्षात घेऊन आपण माहिती करून घेऊ शकतो की आपल्याजवळ पैसा टिकणार की नाही. येथे जाणून घ्या, उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ विनिता नागर यांच्यानुसार हे संकेत कोणकोणते आहेत...
1. अनामिका बोटावर तीळ
ज्या लोकांच्या अनामिक म्हणजे रिंग फिंगरवर तीळ असतो, ते पैशांची सेव्हिंग करू शकत नाहीत. या लोकांना जीवनात अनेकवेळा मोठमोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागू शकते.
2. सूर्य रेषेवर तीळ
एखाद्या व्यक्तीच्या रिंग फिंगरच्या खाली सूर्य पर्वतावर तीळ असल्यास, त्यालाही पैसे कमावण्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागते. यांच्या आयुष्यात आर्थिक अडचणी चालूच राहतात.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या संदर्भात इतर काही खास माहिती... -
3. आयुष्य रेषेवर तीळ
आयुष्य रेषा अंगठ्याजवळ शुक्र पर्वताला घेरलेली असते. एखाद्या व्यक्तीच्या हातावरील या रेषेवर तीळ असल्यास त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक संतना सामोरे जावे लागते. हे लोक पैशांची बचत करू शकत नाहीत.
4. मणिबंधापासून शनी पर्वतापर्यंत रेषा
एखाद्या व्यक्तीच्या हातावर मणिबंधापासून निघून मधल्या बोटाखाली शनी पर्वतापर्यंत रेषा जात असेल तर हासुद्धा अडचणींचा संकेत आहे. मणिबंध हाताच्या मनगटावर असतो.