Home | Jeevan Mantra | Jyotish | Hasta Rekha | Palmistry Prediction In Marathi

हातावर हे एक अशुभ चिन्ह असल्यास समजावे तुमचे दुःख सहजपणे संपणार नाही

रिलिजन डेस्क | Update - Jul 13, 2018, 12:07 AM IST

ज्योतिषमध्ये भविष्य सांगणाऱ्या विविध विद्या आहेत, यामधीलच एक विद्या हस्तरेषा आहे. हस्तरेषा ज्योतिषच्या मदतीने हातावरील र

 • Palmistry Prediction In Marathi

  ज्योतिषमध्ये भविष्य सांगणाऱ्या विविध विद्या आहेत, यामधीलच एक विद्या हस्तरेषा आहे. हस्तरेषा ज्योतिषच्या मदतीने हातावरील रेषांची बनावट आणि खास चिन्ह पाहून भविष्य आणि स्वभावाविषयी बरीच माहिती समजू शकते. हस्तरेषा शास्त्रामध्ये विविध चिन्ह सांगण्यात आले आहेत. उदा- चक्र, झेंडा, त्रिभुज, द्वीप इ. उज्जैनच्या हस्तरेषा विशेषज्ञ डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, हातावरील वेगवेगळ्या ठिकाणी द्वीप चिन्ह असल्यास त्याचे काय फळ प्राप्त होते....


  1. गुरु पर्वतावर द्वीप
  एखाद्या व्यक्तीच्या हातावरील गुरु पर्वतावर द्वीप चिन्ह असल्यास आत्मविश्वासाची कमी राहते. या पर्वतावर हे चिन्ह अशुभ मानले जाते.


  2. शनी पर्वतावर द्वीप
  शनी पर्वतावर द्वीप चिन्ह असल्यास व्यक्ती बहुतांश वेळेस दुःखी राहतो. यासोबतच जीवनात मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


  3. सूर्य पर्वतावर द्वीप
  सूर्य पर्वतावर द्वीप असल्यास व्यक्तीला समाज आणि घर-कुटुंबात सहजपणे मान-सन्मान प्राप्त होत नाही. खूप कष्ट करूनही अडचणींना सामोरे जावे लागते.


  4. बुध पर्वतावर द्वीप
  बुध पर्वतावर हे चिन्ह असल्यास व्यापारात यश प्राप्त होत नाही. धन हानीचे योग जुळून येतात. बौद्धिक कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, चंद्र आणि शुक्र पर्वतावर द्वीप चिन्ह असल्यास काय होते...

 • Palmistry Prediction In Marathi

  5. चंद्र पर्वतावर द्वीप 
  चंद्र पर्वतावर द्वीप चिन्ह असल्यास व्यक्ती कलात्मक काम करू शकत नाही. हे लोक मानसिक तणावाचा सामना करतात.

 • Palmistry Prediction In Marathi

  6. शुक्र पर्वतावर द्वीप
  शुक्र पर्वतावर द्वीप चिन्ह असल्यास व्यक्तीला जोडीदाराकडून मदत मिळत नाही.

Trending