आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अष्टधातुचे कडे घातल्याने दूर होतात राहूचे दोष, वाचा असेच इतरही 6 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार, एखादा ग्रह अशुभ प्रभाव देऊ लागल्यास त्याचाशी संबंधित संकेत आपल्याला दैनंदिन आयुष्यात दिसू लागतात. हे संकेत लक्षात घेऊन आपण त्या ग्रहाशी संबंधित उपाय करू शकतो. यामुळे आपल्या अडचणी कमी होऊ शकतात. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार जाणून घ्या, राहू अशुभ असल्यास कोणत्या प्रकारचे संकेत मिळतात आणि राहूचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत.


अशुभ राहूचे संकेत
1. एखाया व्यक्तीला वारंवार मृत साप किंवा पाल दिसत असल्यास हा अशुभ राहुचा संकेत आहे.
2. राहुचा अशुभ प्रभाव झाल्यास घरात पाळलेला प्राणी उदा. गाय, कुत्रा, म्हैस हरवते किंवा मृत्युमुखी पडते. 
3. राहू अशुभ असल्यास स्मरणशक्ती कमजोर होते.
4. कोणतेही कारण नसताना लोक तुमच्या विरुद्ध उभे होतात आणि वादाची स्थिती निर्माण होते.
5. हाताची नखे वाकडे-तिकडे होऊ लागतात किंवा उखडतात.

 

राहूचे अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी करा हे उपाय...
1. अष्टधातुचे कडे उजव्या हातामध्ये धारण करावे.
2. वाहत्या पाण्यामध्ये काचेचा तुकडा आणि नारळ प्रवाहित करावे.
3. कुष्ठ रुग्णांना आवश्यक असलेल्या गोष्टी दान कराव्यात.
4. काळ्या श्वानाला गोड पोळी खाऊ घालावी.
5. रात्री झोपताना डोक्याजवळ गहू ठेवून सकाळी हे पक्ष्यांना खाऊ घालावेत.

बातम्या आणखी आहेत...