Home | Jeevan Mantra | Jyotish | Hasta Rekha | hastresha Know How Manibandh Can Tell About Your Age

हाताचा हा भाग सांगेल तुमचे आयुष्य आणि नशिबाच्या खास गोष्टी

जीवनमंत्र डेस्क | Update - May 31, 2017, 12:39 PM IST

ज्योतिष शास्त्रामध्ये हातांवरील रेषांना खूप महत्व देण्‍यात आले आहे. हस्‍तरेषा विद्या ही प्राचीन विद्या म्‍हणून ओळखली जाते.

 • hastresha Know How Manibandh Can Tell About Your Age
  ज्योतिष शास्त्रामध्ये हातांवरील रेषांना खूप महत्व देण्‍यात आले आहे. हस्‍तरेषा विद्या ही प्राचीन विद्या म्‍हणून ओळखली जाते. या विद्येचा अभ्‍यास करणा-या व्‍यक्तिला हातावरील रेषा पाहून अचूक भविष्‍य सांगता येते. हातावरील रेषा पाहून व्‍यक्तिच्‍या आयुष्‍यातील गुढ माहिती सांगण्याचे काम ज्‍योतिष शास्‍त्राचा अभ्यास करणारा व्‍यक्ति सांगू शकतो. हातावरील मणिबंध भाग पाहून तुमच्‍या आयुष्‍यात आणि भविष्‍यात काय घडू शकते याची माहिती जाणून घेणे शक्य आहे.

  कुठे असतो मणिबंध-
  हाताचा तळभाग जिथून सुरू होतो, तिथे अडव्‍या काही रेषा असतात. या रेषांना मणिबंध या नावाने ओळखले जाते. हाताचा हा भाग पाहून व्यक्तीच्या वय आणि भविष्याविषयी बऱ्याच गोष्टी समजू शकतात. हस्तरेषा ज्योतिष शास्त्रानुसार मणिबंध पाहून व्यक्तीच्या वयाबद्दलही जाणून घेणे शक्य आहे.

  पुढे जाणून घ्या, मणिबंधाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...

 • hastresha Know How Manibandh Can Tell About Your Age
 • hastresha Know How Manibandh Can Tell About Your Age
  मणिबंधावर एक रेषा असेल तर -
  जर एखाद्या व्‍यक्तिच्‍या मणिबंधवर एकाच रेषा असले तर ती व्‍यक्ती श्रेष्‍ठ गुण स्वरुपात ओळखली जाते. जर मनगटावर रेषा संपूर्ण वर्तुळाकार कुठेही खंडित झालेली नसेल तर अशा व्यक्तीला पैसा, संपत्ती प्राप्‍त होते.

  वय - मणिबंधामध्‍ये एक रेषा शुभ असेल तर त्‍या व्‍यक्तिचे वय 30 वर्ष असू शकते. जर मणिबंध रेषेमध्‍ये अशुभ लक्षणे दसित असतील तर वय कमी होण्‍याची शक्‍यता अधिक असते. व्यक्ती अल्पायु असू शकतो.
 • hastresha Know How Manibandh Can Tell About Your Age
  मणिबंधावर दोन रेषा असतील तर -
  जर एखाद्या व्यक्तीच्या मणिबंधावर दोन रेषा अखंडित, वलयाकार असतील तर हे शुभ लक्षण मानले जाते. हे लोक एखाद्या राजाचे मंत्री असू शकतात. यांनाही जीवनात विविध सुख-सुविधा प्राप्त होतात.
 • hastresha Know How Manibandh Can Tell About Your Age
  मणिबंधावर तीन रेषा असतील तर-
  जर तुमच्‍या तळहताच्या मनगटावर तीन रेषा दिसत असतील आणि त्‍या पूर्ण वर्तुळासारख्‍या असतील तर, तो व्‍यक्ती भाग्‍यशाली व्‍यक्‍ती ठरतो. अशा प्रकारचा मणिबंध ज्‍या व्‍यक्तिच्‍या हतावर असतो, त्‍या व्‍यक्तिच्‍या जीवनात ऐश्वर्य, सुख मोठ्या प्रमाणात असते.
  जर मणिबंधामध्‍ये तीन रेषा असतील आणि त्‍या तुटलेल्‍या दिसत असतील तर हे अशुभ लक्षण मानले जाते. ज्‍या लोकांच्‍या हातावर अशा रेषा असतात, त्‍यांना कष्‍ट करूनही यश मिळत नाही.
 • hastresha Know How Manibandh Can Tell About Your Age
  या बाबी आहेत महत्त्वाच्‍या-
  भाग्यशाली असण्यासाठी मणिबंधावर फक्‍त रेषा असूनच चालत नाही, तर त्‍या रेषा सुंदर, अखंडित, वर्तुळाकार असायला हव्‍यात. खंडीत झालेल्‍या रेषा लाभदायक ठरत नाहीत. मनगटावर पुर्ण रेषा नसेल तर शुभ प्रभावाचा लाभ होत नाही.
  मणिबंधासोबतच मनगटावरच्‍या इतर रेषांचा अभ्‍यास करायला हावा. इतर रेषांच्या शुभ-अशुभ प्रभावामुळे मणिबंधचे प्रभाव बदलू शकतात.

Trending