आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धन प्राप्तीसाठी कासवाची अंगठी घालायची असल्यास, 30 एप्रिलला आहे खास मुहूर्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिजनल डेस्क : अनेक लोक घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात कासवाची मूर्ती ठेवतात. धनाची कमतरता कमी करण्यासाठी कासवाची अंगठी घालतात. तुम्हालाही असे काही करायचे असेल तर 30 एप्रिल वैशाख पोर्णिमेला याचा सर्वात दुर्मिळ मुहूर्त आहे. संपुर्ण वर्षातील हा सर्वात खास दिवस आहे. यादिवशी धनाच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणताही उपाय करता येऊ शकतो.


30 एप्रिलला वैषाख पोर्णिमा आणि भगवान गौतम बुध्दांचा जन्मोत्सव आहे. याच दिवशी विष्णु देवाच्या अजून एक कूर्ण अवताराचा जन्मोत्सव आहे. कूर्म म्हणजे कासव. 
- भागवत महापुराणामध्ये एक कथा आहे. जेव्हा देवता आणि दानवांनी अमृताची प्राप्ती करण्यासाठी समुद्र मंथनाचा निर्णय घेतला. मदरांचल पर्वताला मथनी आणि वासुकी नागाने बांधून समुद्र मंथन करण्यात आले. ज्यावेळी मदरांचल पर्वत समुद्रात स्थिर होत नव्हता तेव्हा विष्णु देवाने कासवाचे रुप घेऊन समुद्रामध्ये जाऊन ते आपल्या पाठीवर घेतले. देवाच्या या रुपाला कूर्म किंवा कश्यप अवतार म्हटले गेले. 
आपल्या परंपरांमध्ये कूर्म जन्मोत्सव साजरा करण्याची विशेष परंपरा नाही. परंतू खुप कमी लोकांना माहिती असेल की, नवीन घर बांधणे, वास्तु सुधारणे, वास्तू दोषांचे निराकरण करण्यासाठी हा दिवस खुप खास आहे. तुम्ही धन संबंधीत समस्या दूर करण्यासाठी आपल्या हाताच्या इंडेक्स फिंगर किंवा रिंग फिंगरमध्ये कासवाची अंगठी घालू शकता. हे घातल्याने तुम्हाला धनाचा पाऊस तर पडणार नाही. परंतू धनासंबंधीत येणा-या अडचणी दूर होतील.

अशी घालावी कासवाची अंगढी


- एकदिवस अगोदर चांदीच्या कासवाची अंगढी खरेदी करा.
- हे कच्चे दूध किंवा गंगा जलमध्ये बुडवून घराच्या मंदिरात ठेवा.
- वैशाष पोर्णिमेला विष्णु देव आणि कश्यप (कूर्मावतार) चे ध्यान करा.
- 11 वेळा  ऊँ श्रीं कुर्माय नमः मंत्राचा जाप करा आणि कूर्म देवाला प्रार्थना करा.
- दुपारी 12 ते 12.30 या काळात अभिजीत मुहूर्तावर आपल्या उजव्या हाताच्या इंडेक्स किंवा रिंग फिंगरमध्ये ही अंगठी घाला.

बातम्या आणखी आहेत...