आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 एप्रिलला शुभ योग, शिवलिंगावर अर्पण करा दूध, होऊ शकतो धनलाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मात वैशाष महिन्याच्या पोर्णिमेला खुप विशेष मानले जाते. यावेळी 30 एप्रिलला सोमवारी ही पोर्णिमा आहे. सोमवारी पोर्णिमेचा योग असल्यामुळे सोमवती पोर्णिमेचा योग जुळत आहे. यासोबतच या दिवशी अजून काही खास योग जुळत आहेत. 


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावालानुसार, यावेळी वैशाख पोर्णिमेला 3 वर्षांनंतर सिध्दि योगाचा शुभ संयोग जुळतोय. हा योग दान करण्यापासून तर खरेदी करण्यापर्यंत शुभ मानला जातो. असा योग नंतर 2022 मध्ये जुळेल. या दिवशी स्वाती नक्षत्र आणि तुळ राशीचा चंद्र समृध्दी आणि वैभव प्रदान करेल.


स्वाती नक्षत्र 27 नक्षत्रांमध्ये दान पुण्य प्रदान करणारे नक्षत्र आहे. याचे अधिपती वायुदेव आहेत. याच प्रकारे सिध्दि योगाचे अधिपती गणपती आहेत. ते प्रत्येक कार्यात सिध्दि प्रदान करतात. तुळाच्या चंद्राने वैभव वाढेल. या दिवशी बुध्द जयंती साजरी केली जाईल.


या दिवशी करा हे उपाय
1. पोर्णिमा तिथिचा स्वामी चंद्रदेव आहे. यामुळे या दिवशी चंद्राची पूजा करावी. पोर्मिमेच्या संध्याकाळी चंद्रदेवाला खीरचा नैवेद्य दाखवावा. यामुळे दुर्भाग्य कमी होते.
2. चंद्र महादेवाच्या मस्तकावर विराजित आहे. यामुळे महादेवाचा कच्च्या दूधाने अभिषेक करावा. यामुळे धन लाभाचे योग जुळतात.
3. पोर्मिमेच्या संध्याकाळी पिंपळाच्या खाली गायीच्या शुध्द तुपाचा दिवा लावा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि पायांसंबंधीत फायदे होऊ शकतात.
4. या दिवशी महालक्ष्मी यंत्राची पूजा करुन आपल्या देवघरात स्थापित करा आणि याची रोज पूजा करा. यामुळे धनलाभ होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...