आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायकाला आधीच लागली होती श्रीदेवीच्‍या मृत्‍यूची कुणकुण, जाणुन घ्‍या सिक्‍स्‍थ सेन्‍सविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वेळेनूसार रविवारी रात्री 1 वाजता श्रीदेवीच निधन झाल होत. ही बातमी भारतात येईपर्यंत रात्रीचे 2 वाजले होते. मात्र त्‍यापूर्वी सव्‍वा एक वाजताच अमिताभ यांनी ट्विट केल होत की,  'न जाने क्यूँ, एक अजीब सी घबराहट हो रही है'. म्‍हणजेच श्रीदेवीच्‍या मृत्‍यूच्‍या काही काळ आधीच त्‍यांच्‍या मनाला अनामिक भीती वाटत होती. त्‍यानंतर श्रीदेवीच्‍या मृत्‍यूची बातमी येताच त्‍यांची ही भिती खरी ठरली. बिग बींना श्रीदेवीच्‍या मृत्‍यूची कुणकुण आधीच लागली होती, अशी चर्चा आता सोशल मिडीयावर होत आहे. अमिताभ बच्‍चन यांच्‍यासोबत दुस-यांदा असा योगायोग होत आहे. यापूर्वीही स्मिता पाटील यांनी मध्‍यरात्री 2 वाजताच अमिताभना फोन करुन भविष्‍यात होणा-या एका अपघाताबाबत माहिती दिली होती.  


अमिताभ यांच्यासोबत घडणा-या दुर्घटनेची स्मिता यांना आली होती पूर्वकल्पना
'कुली' शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांसोबत एक मोठी दुर्घटना घडली. एका फायटींग सीनमध्ये अभिनेता पुनीत इस्सच्या एका ठोश्यामुळे अमिताभ यांच्या आतड्याला जबर मार बसला होता. त्यावेळी तर अमिताभ यांना त्यांना किती मार लागला आहे याची जाणीव झाली नाही. पण काही वेळाने जेव्हा अमिताभ यांच्या पोटात दुखायला लागले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते.आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ यांना त्यांच्या या अपघाताविषयी अगोदरच कोणीतरी कल्पना दिली होती ती व्यक्ती होती अभिनेत्री स्मिता पाटील.

अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, कुली चित्रपटाचे शूटिंग बंगळुरुमध्ये सुरु होते. त्यादरम्यान एकदा रात्री २ वाजता मला रिसेप्शनमधून फोन आला. त्यांनी सांगितले की, अभिनेत्री स्मिता पाटील यांना तुमच्याशी बोलायचे आहे. मी चरकलो कारण मी कधीही स्मिताशी इतक्या रात्री बोललो नव्हतो. मी फोन घेतल्यावर मला समोरुन स्मिता यांनी विचारले, तुमची तब्येत ठिक आहे ना? यावर मी हो असे उत्तर दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्यासोबत अपघात घडला.

 

सिक्‍स्‍थ सेन्‍स म्‍हणजे काय?

असे आपल्‍यासोबतही अनेकदा घडते. म्‍हणजे भविष्‍यात होणा-या घटनेची आपल्‍याला पूर्वकल्‍पना येते. नेमके काय होणार, हे आपल्‍या लक्षात येत नाही. मात्र नेमक्‍या कशासंदर्भात घडणार आहे, याची आपल्‍याला कल्‍पना येते. यालाच मनोविज्ञानशास्‍त्रात सिक्‍स्‍थ सेन्‍स म्‍हणतात.

 

कशी घडते ही प्रक्रिया..
सिक्स्थ सेन्स ही मानसिक चेतनेशी संबंधित एक प्रक्रिया आहे. असे म्‍हणतात की, जगातील प्रत्येक व्यक्तीकडे ही असते. सिक्‍स्‍थ सेन्‍स नैसर्गिक असते तसेच हिला प्राप्‍तही करता येते. या सेन्‍समुळेच कोणत्याही व्यक्तीला स्वतःसोबत किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत भविष्यात घडणाऱ्या काही घटनांचे पूर्वाभास होतात. यामुळे वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करणं सोपं जातं. एखादा अवघड निर्णय घेणंही यामुळे शक्य होतं. नातेसंबंधांमध्ये योग्य ती भूमिका घेण्यास मदत होते आणि अर्थातच करिअरचा मोठा पल्ला गाठायलाही याचा उपयोग होतो. परंतु लहान मुलांमध्ये वयस्क लोकांच्या तुलनेत ही सेन्स जास्त प्रभावी असते. वयस्क झाल्यानंतर ही शक्ती कमी होते. काही खास लोकांमध्येच ही शक्ती कायम राहते. तुम्हालाही तुमची सिक्स्थ सेन्स नेहमी अॅक्टिव्ह ठेवण्याची इच्छा असल्यास पुढे सांगितलेले उपाय ट्राय करू शकता...


पुढील स्‍लाइडवर वाचा, सिक्‍स्‍थ सेन्‍स अॅक्‍टीव्‍ह करण्‍याचे उपाय...

बातम्या आणखी आहेत...