आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या दिवशी लग्न केल्यास मिळते अक्षय्य सुख आणि अपार धन-वैभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

18 एप्रिलला, वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आह. या तिथीला अक्षय्य तृतीया असे म्हटले जाते. भारतीय कालगणनेनुसार साडेतीन श्रेष्ठ मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया एक खास मुहूर्त आहे. अक्षय्यचा अर्थ कधीच क्षय न होणारे, जे नेहमी कायम राहते. या दिवशी भगवान विष्णूंचे अवतार परशुराम यांचाही जन्म झाला होता. परशुराम चिरंजीवी आहेत म्हणजेच त्यांचे आयुष्य क्षय होणार नाही. चार युगांमध्ये त्रेतायुगचा आरंभही याच तिथीला झाला होता.  उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या दिवशी करण्यात आलेल्या दान, पूजन आणि दक्षिणेचे अक्षय्य फळ प्राप्त होते.  


या तिथीला लग्न करणेही शुभ राहते
पं. शर्मा यांच्यानुसार शास्त्रामध्ये लिहिले आहे की - वैशाखे तथा ज्येष्ठे पतिउत्यंतवल्लभा। म्हणजेच वैशाख मासामध्ये लग्न केल्यास पती-पत्नीमधील प्रेम कायम राहते. याच कारणामुळे मानले जाते की, या तिथीला लग्न केलेल्या लोकांचे बंधन अक्षय्य राहते म्हणजेच सातजन्म टिकते. पुढे जाणून घ्या, राशीनुसार खास गोष्टी..

बातम्या आणखी आहेत...