Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

धन लाभाचे योग आहेत, या आठवड्यात दूर होईल जॉब आणि बिझनेसचे टेंशन

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 08, 2018, 04:13 PM IST

8 ते 14 जानेवारीमधील काळ 8 राशीच्या लोकांसाठी चांगला आहे. या सात दिवसात चंद्र गुरु आणि मंगळासोबत राहिल.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  8 ते 14 जानेवारीमधील काळ 8 राशीच्या लोकांसाठी चांगला आहे. या सात दिवसात चंद्र गुरु आणि मंगळासोबत राहिल. ग्रहांची ही स्थिती लक्ष्मी आणि गजकेसरी योग जुळवत आहे. राजयोग जुळत असल्यामुळे या आठवड्यात काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. तर काही लोकांच्या जॉब आणि बिझनेससंबंधीत अडचणी दूर होण्याचे योग जुळत आहेत. या सात दिवसात या 8 राशीचे लोक एखादे मोठे काम सुरु करतील. या दिवसात करियरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. तर इतर 4 राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मिश्रित स्वरुपाचा राहिल.


  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या संपुर्ण राशीभविष्य...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  मेष
  आठवड्यात चंद्राचा संचार षष्ठ स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत होत राहील. अनेक चढ-उतार होत आठवड्यात आर्थिक बाबींंचा त्रास होऊ शकतो. कुटुंबातही सर्वांना सोबत घेऊन चालावे लागेल. पाहुण्यांचे आगमन होईल. अन्य प्रकरणांत हस्तक्षेप केल्याने अपमान होऊ शकतो. आठवड्यात भीती चिंता सतावू शकते. 

   

  व्यवसाय व्यापार - शेअर, घरात गुंतवणूक करु नका. नोकरीत सतर्क राहा.
  आरोग्य - आठवड्यात मूत्र विकार व पित्ताची समस्या उद्भवू शकते.
  शिक्षण - शिक्षकाचे सहकार्य राहू शकते. मित्रांचेही सहकार्य मिळू शकते.
  प्रेम - प्रेमात अचानक समस्या येऊ शकते. वैवाहिक जीवनात तणावाची शक्यता आहे.
  व्रत - कार्तिकेयसमोर दिवा लावा.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  वृषभ
  आठवड्यात जास्त कामे राहू शकतात. वडिलांसोबत समन्वय साधण्यात अडचणी येऊ शकतात. चंद्राची स्थिती चांगली राहिल्याने धनप्राप्ती कायम राहील. बुधवारी सायंकाळनंतर एखाद्या मोठ्या फायद्याची शक्यता अाहे. वादाच्या प्रकरणात यश मिळेल. प्रशासकीय कामांत यश मिळेल. 
  व्यवसाय व व्यापार - व्यावसायिक लाभ वाढेल. अधिकारी बाजूने होतील.
  आरोग्य - पोटात मुरडा व अन्य समस्या होऊ शकतात.
  शिक्षण - अभ्यास, खेळ व मनोरंजनासाठी वेळ मिळेल. 
  प्रेम - संततीपासून प्रेम, जोडीदाराच्या सहकार्यामुळे दिलासा मिळू शकतो.
  व्रत - ओम नमो नारायणाचा जप करा.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  मिथुन
  चतुर्थातील चंद्रामुळे आठवड्याच्या सुरुवातीस खर्चात वाढ होईल स्वत:च्या काही कामामुळे अडचणी निर्माण होतील. मंगळवारी सायंकाळपासून अनुकूल वेळ. इतरांप्रती व्यवहार तीव्र होऊ शकतात. संयम धैर्यातून यश मिळू शकेल. शुक्रवारी प्रवासाचे योग आहेत. शनिवार आनंददायक राहू शकतो. 


  व्यवसाय व व्यापार - कर्मचारी, सहका-यांमध्ये समस्या. व्यापारात लाभ.
  आरोग्य - रक्तदाब व नसा आखडण्याची शक्यता, थकवा व डोकेदुखी होईल. 
  शिक्षण - अनावश्यक कामाचे आकर्षण, शिक्षणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता.
  प्रेम - प्रेयसी/प्रियकराच्या भेटीची शक्यता. वैवाहिक सुख प्राप्त होईल.
  व्रत - महादेवाला कमलाचे फूल अर्पण करा.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  कर्क
  राहूचे गोचर राहील. प्रभाव वर्चस्व असेल. चंद्राच्या स्थितीमुळे धन सहकारी अनुकूल होईल. आठवड्याच्या मध्यात काही किरकोळ प्रशासकीय समस्या येऊ शकतात. मात्र, त्वरित त्या समाप्त होतील. वादग्रस्त प्रकरणात समेटाची चिन्हे. कुटुंबात सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. 


  व्यवसाय व व्यापार - प्रलोभनाच्या योजनांपासून सावध. नोकरीत बदली.
  आरोग्य - पाय व हाडात वेदना शक्य. धुळीपासून दूर राहा.
  शिक्षण - विशेष प्रशिक्षणासाठी निवड, शैक्षणिक सहलीचे योग.
  प्रेम - अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव प्राप्त होतील, यशही मिळेल.
  व्रत - महाकालीचे दर्शन घ्या.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  सिंह
  द्वितीय स्थानातील चंद्रामुळे समस्यांचे निराकरण होऊ शकते तसेच मित्रांचे सहकार्य मिळेल. विरोधकांना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. उद्दिष्टपूर्ती वेळेत होईल दिखाऊपणावर खर्च होऊ शकतो. संशयी स्वभावामुळे नुकसान होईल. आठवड्यात अज्ञात भीती राहील खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. 


  व्यवसाय व व्यापार - व्यवसायात यश व नोकरीत पदोन्नती शक्य.
  आरोग्य - थंडीमुळे कंबर व छातीत वेदना. पायाच्या पंजामध्येही वेदना होण्याची शक्यता आहे.
  शिक्षण - अनेक यशस्वी प्रयोगांत संधी प्राप्त होईल व शिक्षकाचे सहकार्य मिळेल.
  प्रेम - प्रेमात विरह व वैवाहिक जीवनात सुधारणा राहिल.
  व्रत - बुधवारी गणेशाला दूर्वा अर्पण करा.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  कन्या
  चंद्राचे राशीत असणे विशेष यश देणारे आहे. आठवड्यात जुन्या ओळखींच्या लोकांची भेट होऊन आनंदी राहाल. पराक्रमात सुधारणा होऊ शकते.कुटुंबातील वातावरणही अनुकूल राहील. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी व्हाल. शनिवारी फिरायला जाण्याची संधी मिळेल. 


  व्यवसाय व व्यापार - व्यापारात लाभ. नोकरीत धनलाभ होईल.
  आरोग्य - पोट व त्वचाविकार समस्या. उन्हापासून काळजी घ्या.
  शिक्षण - वेळ चांगली आहे. अनपेक्षित चांगला निकाल लागेल.
  प्रेम - जोडीदाराकडून भेटवस्तू, वैवाहिक जीवनात एकत्र राहण्याची संधी.
  व्रत - गणपतीला दुधाचा नैवेद्य दाखवा.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  तूळ
  द्वादश स्थानातील चंद्र उत्पन्नात घट निर्माण करू शकतो तसेच तो खर्चात वाढ होण्याचे संकेत देतो. आठवड्याच्या मध्यानंतर या स्थितीत अनुकूलता येईल. पराक्रम श्रेष्ठ राहील, मात्र इतरांपेक्षा जास्त कष्ट करावे लागू शकतात. श्रेय मिळण्याची शक्यता कमीच आहे. वादग्रस्त प्रकरणांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. 


  व्यवसाय  व व्यापार - अधिका-यांची नाराजी ओढावू शकते. व्यापारात सुलभता.
  आरोग्य - सर्दीसारखी समस्या शक्य. डोळ्यांची समस्या.
  शिक्षण - व्यावसायिक शिक्षण, पादविका विद्यार्थांसाठी उत्कृष्ठ वेळ आहे. 
  प्रेम - प्रियकर/प्रेयसीची वागणूक विचलित करणारी ठरेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल.
  व्रत - राधा-कृष्णाचे दर्शन घेऊन दीपदान करा.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  वृश्चिक
  अनोळखी व्यक्तीपासून सावध राहायला हवे. जोखमीच्या कामापासून दूर राहा. आठवड्याच्या मध्यात चंद्र द्वादश असेल, यामुळे खर्च वाढेल अाणि उत्पन्नात घट येऊ शकेल. अज्ञात भीतीची चिंता सतावेल. यासंदर्भात जास्त विचार करू नका, कारण आठवड्यात परिस्थिती अनुकूल होईल. 
  व्यवसाय व व्यापार - नोकरीत प्रामाणिक काम करुन, व्यवहार व्यवस्थित करणे गरजेचे. 
  आरोग्य - पोटाच्या आतमधील अवयवात वेदना. आहारावर नियंत्रण हवे.
  शिक्षण - मनाप्रमाणे सुविधा मिळू शकतात.
  प्रेम - जोडीदाराच्या वागणुकीमुळे उपेक्षा, पती/पत्नीस वेळ द्या.
  व्रत - सूर्यास पाणी व कुंकू मिळून अर्घ्य द्या.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  धनू
  राशी स्वामी शत्रू घरात असल्यामुळे निराशाजनक स्थिती निर्माण होऊ शकते. शिवाय कामात निष्काळजीपणा येऊ शकतो. इच्छित लक्ष्य गाठण्याचे प्रयत्न कमी पडतील. चंद्राची स्थिती सौम्यपणा समाप्त करून राग वाढवेल. आवश्यकतेनुसार पैशाच्या व्यवस्थेसाठी कर्ज घ्यावे लागू शकते. 
  व्यवसाय व व्यापार - व्यावसायिक प्रवास, नोकरीत वादाची स्थिती राहिल.
  आरोग्य - शारीरिक अशक्तपणा, डोळे व कानात वेदना होऊ शकतात.
  शिक्षण - अभ्यासात विघ्न व प्रयत्नांमध्येही अडचणी येऊ शकतात.
  प्रेम - जोडीदाराची भेट व दीर्घकाळापर्यंत सोबत राहण्याची संधी.
  व्रत - गणपतीला तूप अर्पण करा.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  मकर
  कामात व्यग्रता राहणार असली तरी मुदतीत काम केल्यामुळे तुमचे कौतुकही होणार आहे. आठवड्याच्या मध्यापासून वेळ वाया घालवणाऱ्यांपासून त्रास होऊ शकतो. मंगळाच्या दृष्टीने शत्रू शांत करण्यात यशस्वी व्हाल. घर ठीकठाक करण्यात खर्च होण्याची शक्यता आहे. 
  व्यवसाय व व्यापार - व्यावसायिक गुपिता उघड होण्याची शक्यता आहे.
  आरोग्य - ओठ फाटणे, त्वचा विकार शक्य. पाय दुखू शकतात.
  शिक्षण - शिक्षकांचे अपेक्षित सहकार्य व अभ्यासात मन लागेल.
  प्रेम - प्रेम प्रस्तावात अपयश व वैवाहिक सुखप्राप्ती शक्य आहे.
  व्रत - दुर्गामातेला लाल पुष्प वाहा.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  कुंभ
  अष्टमातील चंद्र सुरुवातीस खर्चवाढीसोबत चिंताही वाढवेल. बुधवारी गुरुची पूर्ण दृष्टी राशीवर अाहे. स्थावर मालमत्ता खरेदीची योजना बनेल. बचतीत वाढ होईल कामाच्या ठिकाणी मनासारखे वातावरण राहील. अपेक्षित कामे वेळेवर पूर्ण हाेतील नव्या कामाची प्राप्तीही होईल. वादात विजय प्राप्त होईल. 
  व्यवसाय व व्यापार - गुंतवणुकीत काळजीपूर्वक. लाभाच्या योजनांत संयम हवा.
  आरोग्य - दुखापतीची भीती आहे. डाव्या पंजात वेदना. वाहनाच्या काळजीपूर्वक वापर करायला हवा.
  शिक्षण - विश्वासार्ह मित्रांसोबत राहा व अभ्यासात लक्ष द्या.
  प्रेम - कुटूंबाकडे लक्ष संततीसुख मिळेल.
  व्रत - हनुमानाला तेलाचा दिवा लावा.

 • 12 Zodiac Weekly Rashifal 8 To 14 January 2018 Horoscope

  मीन
  राशी स्वामी अष्टम स्थानी असल्यामुळे अनावश्यक त्रास होऊ शकतो. या काळात कमी प्रभाव जाणवू शकतो. चंद्राच्या दृष्टीमुळे उत्पन्नाच्या प्रकरणात कमतरता येणार नाही. वर्चस्वासाठी प्रयत्न करावे लागतील. पूर्वस्थिती प्राप्त करण्यासाठी यशस्वी व्हाल. संशयात्मक कामापासून दूर राहा. 


  व्यवसाय व व्यापार - व्यवसायात स्पष्ट कामे करा. संकोचामुळे नुकसान. 
  आरोग्य - पोटदुखी व नसा आखडू शकतात. थंडीमुळेही अडचणी शक्य.
  शिक्षण - स्पर्धात्मक निकाल चांगले राहतील. उज्ज्वल यशाकडे आगेकूच.
  प्रेम - जोडीदाराकडून सहकार्य मिळेल व प्रेमात निराशा हाती येईल.
  व्रत - महामृत्यूंजय मंत्र जप करा.

Trending