आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार आणि पौर्णिमा योगात राशीनुसार करा हनुमानाचे हे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (29 मे) मंगळवार आणि पौर्णिमेचा योग जुळून येत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षानंतर येणाऱ्या अधिक मासात हा योग जुळून आल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या योगामध्ये हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार काही उपाय केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण   होऊ शकतात. येथे जाणून घ्या, राशीनुसार उपाय...


मेष- हनुमानाला लाल रंगाचे वस्त्र आणि शेंदूर अर्पण करावे.

वृषभ- चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमान मंदिरात लावून पांढरे फुल अर्पण करावे.

मिथुन- हनुमानाला गोड पान (तंबाकू आणि सुपारी न टाकलेले) अर्पण करून गुलकंदाचा नैवेद्य दाखवावा.

कर्क- हनुमानाला खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.

सिंह- हनुमानाला लाल फुलांची माळ आणि मिठाई अर्पण करा.

कन्या- हनुमानाला बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.

तूळ- हनुमानाला तळलेले पदार्थ उदा. पुरी, भाजे इ. नैवेद्य दाखवावा.

वृश्चिक- हनुमानाला मुगाचा हलवा आणि उडदाचे वडे अर्पण करावेत.

धनु- हनुमानाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा आणि वस्त्र अर्पण करावेत.

मकर- हनुमानाला पांढरे फुल आणि लाल वस्त्र अर्पण करावे.

कुंभ- हनुमानाला गुलाबाचे अत्तर अर्पण करावे.

मीन- हनुमानाला लाल झेंडा, चमेलीचे फुल तसेच रुईच्या पानांची माळ अर्पण करावी.

बातम्या आणखी आहेत...