आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळवार आणि अमावास्येचा खास योग, हे उपाय करतील धनवान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 16 जानेवारीला अमावास्या आहे. या महिन्यात मंगळवारी अमावस्या आल्यामुळे आणखीच खास योग जुळून आला आहे. मंगळवारमुले याला भौमवती अमावस्या असेही म्हटले जाते. धनलाभ आणि कार्यसिद्धीसाठी ही अमावास्या खास मानली जाते. मौनी अमावास्येला स्नान, दान, श्राद्ध आणि व्रत करण्याचे विशेष महत्त्व आपल्या धर्म ग्रंथांमध्ये सांगण्यात आले आहे. तंत्र शास्त्रामध्येही या तिथीला खास मानले गेले आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे शुभफळ लवकर प्राप्त होते. हे उपाय अत्यंत सोपे आहेत. येथे जाणून घ्या, या दिवशी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


मौनी अमावस्येच्या रात्री 10 वाजता स्नान करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. उत्तर दिशेला तोंड करून आसनावर बसा. समोर एक चौरंग घेऊन एका ताटात स्वस्तिक किंवा ऊँ काढून त्यावर महालक्ष्मी यंत्र स्थापित करा. त्यानंतर एक शंख दुस-या ताटात स्थापीत करा. थोडे तांदूळ केशरात रंगवून ते त्या शंखात टाका. शुद्ध तुपाचा दिवा लावून खाली दिलेल्या मंत्राचा ११ माळ जप करा.


मंत्र
सिद्धि बुद्धि प्रदे देवि मुक्ति मुक्ति प्रदायिनी।
मंत्र पुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते।।

जप झाल्यानंतर सर्व सामग्री नदीत किंवा तलावात विसर्जित करा. हा उपाय केल्याने थोड्या दिवसातच तुम्हाला अचानक धनलाभ होईल.


अमावस्येचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...