आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार योग्य वस्तूंचे दान केल्यास लवकर दूर होऊ शकतो वाईट काळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष उपायांमध्ये सर्वाधिक प्रभावी उपाय म्हणजे दान करणे. कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी राशीनुसार वेगवेगळ्या गोष्टींचे दान केले जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मेषपासून मीनपर्यंत राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे...


मेष - या राशीचा स्वामी मंगळ असून ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाला ग्रहांचे सेनापती मानले गेले आहे. यामुळे या राशीच्या लोकांनी मंगळाशी संबंधित गोष्टी उदा. लाल कपडे, सोने, तांब्याचे भांडे, केशर, कस्तुरीचे दान करावे.


वृषभ - या राशीच्या लोकांनी चांदीचे दागिने, पांढरे कपडे, तूप, तेल, काळे वस्त्र, लोखंडाचे दान करावे. या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे.


मिथुन - या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. या राशीच्या लोकांनी हिरवे वस्त्र, तूप, पैसे, सोने, शंख, फळ दान करावेत. या गोष्टींचे दान केल्यास या लोकांच्या अडचणी दूर होऊ शकतात.


कर्क - या राशीचा स्वामी चंद्र आहे. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र मनाचे देवता आहेत. कर्क राशीच्या लोकांनी पांढरे-लाल वस्त्र, चांदी, तूप, शंख, सोने, तांबे, केशर, कस्तुरीचे दान करणे श्रेष्ठ राहते.


सिंह - सूर्यदेवाचे स्वामित्व असलेली ही एकमेव राशी आहे. या राशीच्या लोकांनी घर, दूध देणार गाय, लाल-पांढरे वस्त्र, सोने, तांबे, केशर, चांदी, तूप, शंख मोतीचे दान करावे.


कन्या - या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी बुध ग्रहाशी संबंधित गोष्टी म्हणजेच हिरवे वस्त्र, काशा धातू, तूप, पैसे, पन्ना, सोने, शंख, फळ दान करणे श्रेष्ठ राहते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींच्या लोकांनी कोणत्या वस्तूंचे दान करावे...

बातम्या आणखी आहेत...