आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅरीड लाईफमधील सर्व अडचणी होतील दूर, जर पती-पत्नीने केले हे 10 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैवाहिक जीवनात प्रेम कायम ठेवण्यासाठी पती-पत्नीने काही खास उपाय नेहमी करत राहावेत. उज्जैनचे भागवत कथाकार पं. मनीष शर्मा यांच्यानुसार पती-पत्नीने एकमेकांच्या इच्छेकडे लक्ष द्यावे. एकाचवेळी दोघांनी क्रोध करू नये. कठीण परिस्थितीमध्ये एकमेकांची मदत करावी. यासोबतच ज्योतिषमधील काही खास उपाय करावेत. येथे जाणून घ्या, वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


> घरामध्ये सुख कायम ठेवण्यासाठी दान-पुण्य करत राहावे. गरिबांना दान केल्याने मोठमोठ्या अडचणी दूर होऊ शकतात.


> रोज सकाळी गायीला चारा किंवा पोळी खाऊ घालावी. शक्य असल्यास नियमितपणे गायीची सेवा करावी. एखाद्या गोशाळेत धन दान करावे.


> गुरु ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी गुरुवारी हळकुंड दान करावे. हा ग्रह वैवाहिक जीवनाला प्रभावित करतो, यामुळे या ग्रहाचेसुद्धा उपाय करावेत.


> मंगळ ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी मंगळवारी मसुराची डाळ दान करावी. मंगळाच्या अशुभ स्थितीमुळे पती-पत्नीमध्ये वादाची स्थिती निर्माण होते.


> भगवान शिव-पार्वती, श्रीराम-सीता किंवा श्रीविष्णू-लक्ष्मी यांची रोज पूजा करावी. या देवतांची पूजा पती-पत्नीने एकत्र करणे जास्त शुभ राहते.


> बेडरूममध्ये कधीही नकारात्मकता दर्शवणारा फोटो लावू नये. या रूममध्ये प्रेम भावक फोटो लावावेत.


> घरामध्ये शांतता राहण्यासाठी घरातील व्यर्थ सामान काढून टाकावे. व्यर्थ खिळे, कुलूप नसलेल्या आणि गंज लागलेल्या चाव्या, लोखंड, खराब लाकडाचे फर्निचर इ. वस्तू वास्तुदोष वाढवतात. यामुळे नकारात्मकता वाढते आणि घराची शांती दूर होते.


> घराच्या छतावर व्यर्थ सामान ठेवू नये. सकाळी लवकर उठून संपूर्ण घराची स्वच्छता करावी. स्नान करावे. पूजेनंतर घरात सुगंधी धूप-दीप लावावेत. यामुळे घराची सकारात्मकता वाढते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...