आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्‍तरानेही दूर होऊ शकतात ग्रहदोष, धनलाभाचीही शक्‍यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्‍क- ज्‍योतिष उपायांमध्‍ये अनेक वस्‍तूंचा उपयोग केला जातो. यामध्‍ये अत्‍तराचाही समावेश आहे. अत्‍तराचा उपयोग विशेषकरून सुंगधासाठी केला जातो. मात्र ज्‍योतिष उपायामध्‍येही याचा उपयोग होतो. 


उज्‍जैनचे ज्‍योतिषाचार्य, पं. प्रवीण द्विवेदी अनूसार, अत्तरासारख्‍या सुंगधित द्रव्‍यांचा उपयोग प्राचिन काळापासून केला जातो. चंदन, गुलाब अशा अनेक पदार्थांपासून अत्‍तर बनवले जाते. आज आम्‍ही तुम्‍हाला अत्‍तरशी संबंधित ज्‍योतिषीय उपायाविषयी सांगणार आहोत. 

 

1. कुंडलीमध्‍ये राहू अशुभ स्‍थानी असेल किंवा राहुची महादशा चालू असेल तर दररोज पाण्‍यामध्‍ये चंदनाचे अत्‍तर टाकून स्‍नान केले पाहिजे. यामुळे राहुचा अशुभ परिणाम दूर होतो. 
2. पति-पत्‍नीमध्‍ये रोज विवाद होत असेल तर गुरूवारी हरश्रृंगारचे अत्‍तर भगवान विष्‍णूला अर्पण करावे. यायामुळे दोघांमध्‍ये वाद होण्‍याची शक्‍यता कमी होते. 
3. धन लाभ हवा असल्‍यास शुक्रवारी गुलाबाचे अत्‍तर देवी लक्ष्‍मीच्‍या चरणी अर्पण करावे.  या उपायामुळे तुमच्‍या इच्‍छाही पुर्ण होऊ शकतात. 
4. शनिदोषामुळे त्रस्‍त असाल तर शनिवारी कस्‍तुरीचे अत्‍तर शनिदेवाला अर्पण करा. यामुळे तुम्‍हाला फायदा होईल. 
5. हनुमानची कृपा प्राप्‍त करायची असल्‍यास मंगळवारी हनुमान मुर्तीच्‍या खांद्यावर केवड्याचे अत्‍तर शिंपडावे. यामुळे तुमच्‍या अडचणी दूर होतील. 

बातम्या आणखी आहेत...