आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिणी 25 मे ते 9 जूनपर्यंत, अंगारक योगामुळे होऊ शकते मोठी दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार, 25 मे पासून रोहिणी नक्षत्र सुरु होईल जे 8 जूनपर्यंत राहील. या वेळी रोहिणी काळात मंगळ आणि केतूचा संयोग नैसर्गिक संकटाची स्थिती निर्माण करू शकतो. या काळात भीषण उष्णता तसेच पाऊस पाडण्याचे योग जुळून येत आहेत. म्हणजेच रोहिणी बरसणार. या योगामुळे काही राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


वादळ-चक्रीवादळ आणि आगीमुळे होऊ शकते नुकसान
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. आनंदशंकर व्यास यांच्यानुसार, 1 मेपासून मंगळ आणि केतू मकर राशीमध्ये सोबत आहेत. हे 6 नोव्हेंबरपर्यंत याच राशीत राहतील. मंगळ आणि केतू एकाच राशीत असल्यामुळे अंगारक योग जुळून येत आहे. या योगामुळे रोहिणी (25 ते 8 जून)नक्षत्रामध्ये भीषण गरमी, चक्रीवादळ, सोसाट्याचा वारा, आग, दुर्घटना आणि राजकारणात उलथा-पालथ होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...