आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजेतच नाही तर ज्योतिष्य उपायांमध्ये कामी येते नारळ, होऊ शकतो धनलाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक पूजन कर्मामध्ये नारळाचा उपयोग अवश्य केला जातो. नारळाला श्रीफळ म्हणतात. श्री म्हणजे देवी लक्ष्मी. यामुळे नारळ फोडूनच प्रत्येक नवीन कामाची सुरुवात केली जाते. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार विविध ज्योतिषीय उपायांमध्ये नारळाचा उपयोग केला जातो. या उपायांनी ग्रहदोषही कमी होऊन धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. येथे जाणून घ्या, नारळाचे काही खास उपाय...


1. धन लाभासाठी एक अखंड नारळ देवी लक्ष्मीला अर्पण करावे. थोड्यावेळाने हे नारळ एका लाल कपड्यात बांधून कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी घरात ठेवावे. यामुळे धनलाभाचे योग जुळून येतील आणि यासोबतच सुख-समृद्धी वाढत राहील.


2. तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जाणवत असल्यास एका नारळावर काजळाने टिळा लावावा. त्यानंतर हे नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवून नदीमध्ये प्रवाहित करावे.


3. बिझनेसमध्ये नफ्यासाठी गुरुवारी एक नारळ पिवळ्या कपड्यात बांधून त्यामध्ये दोन जानवे आणि मिठाई ठेवावी. ही संपूर्ण सामग्री एखाद्या विष्णू मंदिरात अर्पण करावी.


4. राहू किंवा केतू दोषामुळे त्रस्त असाल तर शनिवारी एक सुकलेले नारळ घेऊन अर्धे कापावे. या दोन्ही तुकड्यांमध्ये साखर भरून हे सुनसान ठिकाणी जमिनीत पुरून टाकावे. यामुळे तुमचे ग्रहदोष कमी होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...