आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 जुलैपर्यंत राहील सूर्य, बुध आणि राहुचा योग, अडचणींपासून दूर राहण्यासाठी करा तीन ग्रहांचे उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कर्क राशीमध्ये तीन ग्रहांचा योग जुळून आला आहे. हे ग्रह सूर्य, बुध आणि राहू आहेत. 26 जुलैला बुध ग्रह राशी बदलून कर्क राशीतून सिंह राशीत जाईल आणि हा योग समाप्त होईल. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार सूर्य आणि राहूच्या योगामुळे काही लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या दरम्यान तिन्ही ग्रहांसाठी उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात. येथे जाणून घ्या, 26 जुलैपर्यंत कोणकोणते विशेष उपाय करावेत...


या राशींवर राहील अशुभ प्रभाव
मेष, मिथुन, कर्क, सिंह, तूळ, वृश्चिक, धनु, मीन राशीच्या लोकांवर या तिन्ही ग्रहांचा अशुभ प्रभाव राहील. या लोकांना खूप कष्ट करावे लागतील, त्यानंतरच यश प्राप्त होऊ शकते. यासोबतच घर-कुटुंब आणि समाजात अपमानाला सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये थोडाही हलगर्जीपणा करू नये.


या राशींसाठी शुभ राहील हा योग
वृषभ, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकासांठी हा योग शुभफळ देणारा राहील. या लोकांना शत्रूंवर विजय प्राप्त होईल. जोडीदारासोबत ताळमेळ राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रगतीची एखादी नवीन संधी मिळू शकते.


अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी करू शकता हे उपाय 
> सूर्य ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी रोज सकाळी ऊँ हिरण्य गर्भाय नम: मंत्राचा जप करत सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा.


> बुध ग्रहाचे शुभफळ प्राप्त करण्यासाठी मूग दान करावेत. प्रत्येक बुधवारी श्रीगणेशाला दुर्वा अर्पण कराव्यात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर तीन उपाय...

बातम्या आणखी आहेत...