आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीर्य वर्धक आहे हा मणि, होतात इतरही खास फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तृणमणि नावाचे दुर्लभ उपरत्‍न भाग्‍यशाली समजले जाते. तसेच पौरुषत्‍व वाढवण्‍यासाठीही हे रत्‍न परिधान केले जाते. या रत्‍नाला तृणाकर्ष, कर्पूर, कहरूवा, वृक्षनिर्यासमणि आणि इंग्रजीमध्‍ये अंबेर या नावानेही ओळखले जाते. हे कहरूवा या वनस्‍पतीपासून निघालेले उपरत्‍न आहे. अनेक वर्षे या वनस्‍पतींपासून गोंद निघत असते तेच हळूहळू दगडासारखे ठणक आणि चमकदार बनते. इतर रत्‍नांसारखी यामध्‍येही चमक असते. मात्र हे रत्‍न वजनाला अत्‍यंत हलके असते. यामधून कपूरसारखा गंध येत असल्‍याने याला कर्पूरही म्‍हटले जाते.

 

ज्‍योतिषाचार्य पं. प्रफुल्‍ल भट्ट यांच्‍या अनूसार वराह मिहिरने आपला ग्रंथ बृहत्‍संहिताच्‍या रत्‍नाध्‍यायमध्‍ये या रत्‍नाची उत्‍पत्‍ती आणि त्‍याच्‍या फायद्याविषयी सांगितले आहे. याअनूसार या रत्‍नाला परिधान केल्‍याने पौरूषत्‍व वाढते. चरक संहितामध्‍ये या रतचा तृणकांतमणि नावाने उल्‍लेख आहे. इसवी सन 553मध्‍ये अनेक राजामहाराजांनी हे ग्रंथ परिधान केल्‍याचा उल्‍लेख आहे.

 

हे मणि वीर्यवर्धक आहे. तसेच याला परिधान केल्‍याने ह्रद्याच्‍या आजारांपासूनही दिलासा मिळतो व ह्रदयरोगाची शक्‍यताही कमी होते. ह्रद्याच्‍या अनियंत्रित ठोक्‍यांना हे रत्‍न नियंत्रणात ठेवते. यामुळे रक्‍त, पित्‍त तसेच आतड्यांचे आजारही दूर होतात. त्‍वचेसंबंधी आजारही या रत्‍नामुळे दूर होतात जखमाही लवकर भरतात. काविळ असल्‍यास या रत्‍नामुळे आराम मिळतो. काही वैद्य आयुर्वेदिक औषधी बनवण्‍यासाठीही या रत्‍नाचा वापर करतात.  आभुषणांमध्‍येही या रत्‍नाचा प्रामुख्‍याने वापर केला जातो.


कोठे मिळतो
बाल्टिक समुद्र, इटली, रोमानिया, डेन्‍मार्क, स्‍वीडन आणि सिसलीमध्‍ये हे रत्‍न मिळते.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, कसे ओळखाल या रत्‍नाला...

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...