आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी गुप्त नवरात्रीची नवमी तिथी आणि सर्वार्थसिद्धीचा शुभ योग, करा हा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 21 जुलैला आषाढ मासातील गुप्त नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी दुपारी 1.30 वाजता सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. नवमी आणि सर्वार्थसिद्धीच्या शुभ योगामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केल्यास कोणत्याही व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार देवी भागवतमध्ये देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला यामधीलच काही सोपे उपाय सांगत आहोत.


1. नवरात्रीमध्ये देवी दुर्गाचा आंबा किंवा उसाच्या रसाने अभिषेक केल्यास धनलाभाचे योग जुळून येतात तसेच बुद्धी तल्लख होते.
2. द्राक्ष रसाने देवीचा अभिषेक केल्यास भक्तावर देवीची नेहमी कृपा राहते.
3. गुप्त नवरात्रीच्या शेवटच्या देइव्हशि देवीला गायीच्या दुधाने अभिषेक केल्यास व्यक्तीला सर्व सुख प्राप्त होतात.
4. केशर, कस्तुरी, कमळाच्या पाण्याने देवीला अभिषेक केल्यास प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. पापांचा नाश होतो.
5. देवी भागवतनुसार शनिवारी देवीला गायीच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवावा.

बातम्या आणखी आहेत...