आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 जुलैला शनिवार+नवरात्रचा योग, शनिदेव आणि हनुमानाला प्रसन्न करण्याची संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 21 जुलैला आषाढ मासातील गुप्त नवरात्रीमधील नवमी तिथी आहे. या दिवशी देवी दुर्गा तसेच शनिदेव आणि हनुमानाची पूजा अवश्य करावी. ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची स्थिती शुभ नसेल त्यांनी नवरात्र आणि शनिवारच्या योगामध्ये काही खास उपाय अवश्य करावेत. सध्या शनी धनु राशीमध्ये आहे. यामुळे वृश्चिक, धनु आणि मकर राशीवर शनीची साडेसाती आहे. वृषभ आणि कन्या राशीवर शनीची ढय्या चालू आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, साडेसाती आणि ढय्यामध्ये कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


पहिला उपाय 
प्रत्येक शनिवारी तेलाचे दान अवश्य करावे. यासाठी एका भांड्यामध्ये तेल घेऊन यामध्ये स्वतःचा चेहरा पाहावा. त्यानंतर हे तेल एखाद्या गरजू व्यक्तीला दान करावे.


दुसरा उपाय 
शिवलिंगावर काळे तीळ आणि जल अर्पण करावे. महादेवाच्या ऊँ सांब सदा शिवाय नम: मंत्राचा 108 वेळेस जप करावा. या उपायाने शनिदेव आणि हनुमानाची कृपा प्राप्त होऊ शकते.


तिसरा उपाय
एखाद्या हनुमान मंदिरात जावे. मंदिरामध्ये हनुमानाच्या मूर्तीसमोर दिवा लावून हनुमान मंत्र ऊँ रामदूताय नम: किंवा ऊँ महावीराय नमः चा 108 वेळेस जप करावा. देवाला नारळ अर्पण करावे. शनिदोष आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. नारळ फोडून भक्तांना प्रसाद वाटावा.


चौथा उपाय 
21 जुलै, शनिवारी हनुमानाला लाल वस्त्र, शेंदूर, चमेलीचे तेल, लाल फुल अर्पण करावे. यासोबतच हनुमान चालीसाचा पाठ करावा. या उपायाने सर्व प्रकारच्या अडचणींमधून मुक्ती मिळू शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

बातम्या आणखी आहेत...