आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न, वाढदिवसाला गिफ्ट स्वरूपात हत्ती किंवा मातीपासून बनवलेली मूर्ती देणे शुभ राहते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न असो किंवा वाढदिवस कोणत्याही शुभ प्रसंगी गिफ्ट देण्याची परंपरा आहे. लोक सामान्यतः नगदी पैसे देतात किंवा एखादा शोपीस. वास्तुनुसार गिफ्ट अत्यंत स्पेसिफिक असावे. एखादी अशी वस्तू जी देणारा आणि घेणारा दोघांसाठीही लकी ठरेल. वास्तुमध्ये अशा काही वस्तूंविषयी सांगण्यात आले आहे. या वस्तू गिफ्ट स्वरूपात देणे किंवा घेणे शुभ राहते. येथे जाणून घ्या, कोणत्या आहेत या वस्तू...


1. हत्तीची जोडी 
कोणत्याही शुभ प्रसंगी हत्तीची जोडी देणे किंवा मिळणे अत्यंत शुभ मानले जाते. हत्ती चांदी-सोने किंवा पितळ आणि लाकडाचाही दिला जाऊ शकतो. लक्ष्मीचे सर्वात शुभ स्वरूप हत्ती मानले जाते. यामुळे दिवाळीला गजलक्ष्मीची पूजा केली जाते. हत्तीची मूर्ती तिजोरीत ठेवल्याने बरकत वाढते.


2. सात घोडे 
सात पांढऱ्या घोड्यांची जोड फेंगशुई आणि वास्तू दोन्हीमध्ये शुभ मानली जाते. सात पांढऱ्या घोड्यांचा शोपीस किंवा फोटो गिफ्ट स्वरूपात दिल्यास किंवा मिळाल्यास उत्पन्नाचे साधन वाढू शकतात. सूर्यदेवाच्या रथामध्ये सात घोडे आहेत. हे सात घोडे सात रंगाच्या किरणांचे प्रतीक आहेत.


3. गणेश मूर्ती 
श्रीगणेशाची अशी मूर्ती भेट द्यावी ज्यामध्ये दोन्ही बाजूला श्रीगणेश असतील. श्रीगणेशाचे फक्त मुख दिसावेत आणि पाठ एकच असावी. अशाप्रकारची मूर्ती शुभ मानली जाते कारण श्रीगणेशाच्या पाठीचे दर्शन शुभ मानले जात नाही.


4. कपडे 
लोकांना गिफ्ट स्वरूपात कपडे देणे किंवा घेणेही चांगले मानले जाते. असे केल्याने गिफ्ट देणारा आणि घेणारा दोघांचेही दुर्भाग्य नष्ट होते आणि सौभाग्य वाढते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन वस्तूंविषयी...