आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपत्य सुख आणि धन-संपत्तीच्या बाधा होतील नष्ट, फक्त करा या एक शिव मंत्राचा जप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महादेवांच्या इच्छेने या संपूर्ण सृष्टीचे सृजन ब्रह्मदेवांनी केले. भगवान विष्णू सृष्टीचे पालन करत आहेत. शिव पुराणानुसार जो व्यक्ती भक्तिभावाने शिव पूजा आणि शिव मंत्राचा जप करतो त्याच्या सर्व अडचणी दूर होतात. महादेवांच्या कृपेने अपत्य सुख मिळते तसेच पैशाशी संबंधित अडचणी दूर होतात. महादेवाच्या सर्वात प्रभावशाली मंत्रांपैकी एक मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. या मंत्राचा जप केल्यास सर्व अडचणी दूर होऊ शकतात. रोज सकाळी स्नान केल्यांनतर रुद्राक्षाच्या माळेने या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, महामृत्युंजय मंत्र जपामुळे होणारे काही खास फायदे...


महामृत्युंजय मंत्र  : ऊँ त्रयम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृतात्।


# महामृत्युंजय मंत्र जपाने दूर होतात हे दोष 
> महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने मंगळीक दोष, नाडी दोष, कालसर्प दोष, दृष्ट, रोग, वाईट स्वप्न, वैवाहिक जीवनातील समस्या, अपत्य बाधा आणि इतरही दोष दूर होतात.


# मिळते दीर्घायुष्य 
> दीर्घायुष्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने नियमितपणे महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. भगवान शिव यांना मृत्यूचे देवता मानले जाते. हा मंत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे. या मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला दीर्घायुष्य प्राप्त होऊ शकते.


# आरोग्य प्राप्ती 
> हा मंत्र आजारपणापासून रक्षण करतो. शरीर निरोगी राहते आणि त्वचा उजळ होते.


# यश (सन्मान) प्राप्ती
> या मंत्राचा जप केल्याने भक्ताला समाजात उच्च स्थान प्राप्त होते आणि सन्मान मिळतो.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंत्र जपाने होणारे इतर दोन खास फायदे...

बातम्या आणखी आहेत...