तुळशीखाली ठेवा ही / तुळशीखाली ठेवा ही चमत्कारी वस्तू, घरात येणार नाही दरिद्रता

दिव्य मराठी वेब टीम

Jan 06,2018 11:38:00 AM IST

घराची गरीबी दूर करण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. या उपायांचे पालन केल्यावर घरात सुख-समृध्दि टिकून राहते. यासाठी एक उपाय म्हणजे, तुळशीच्या मुळांजवळ शालिग्राम ठेवून रोज पूजा करावी. शालिग्रामला विष्णु देवाचे स्वरुप मानले जाते. ज्या घरात तुळशीसोबत शालिग्रामची पूजा केली जाते, तिथे दरिद्रता येत नाही. आज जाणुन घ्या शालिग्रामसंबंधीत काही खास गोष्टी.


- शालिग्राम हे नेपाळच्या गंडकी नदीच्या तळाशी सापडतात. काळ्या आणि गुळगुळीत, अंडाकार दगडांना शालिग्राम म्हणतात.
- याला स्वयंभू मानले जाते. यांची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नसते. कोणताही व्यक्ती हे घरात किंवा मंदिरात स्थापित करुन पूजा करु शकतो.
- शालिग्राम वेगवेगळ्या रुपांमध्ये मिळते. काही अंडाकार असतात तर काहींमध्ये छिद्र असतात. या दगडामध्ये शंख, चक्र, गदा किंवा पद्मने खुणा तयार केलेल्या असतात.

घरात शालिग्राम ठेवण्याचे फायदे
1. शालिग्रामची पूजा तुळशीशिवाय पुर्ण होत नाही आणि तुळस अर्पित केल्यावर ते तात्काळ प्रसन्न होतात.
2. शालिग्राम आणि भगवती स्वरुपा तुळशीचा विवाह केल्याने सर्व अभाव, कलह, पाप, दुःख आणि रोग दूर होतात.
3. कन्यादान केल्याने जे पुण्य फळ प्राप्त होते. तेच पुण्यफळ तुळशी शालिग्राम विवाह केल्याने मिळतात.
4. पूजेमध्ये शालिग्रामला स्नान घालवून चंदन लावा आणि तुळशी अर्पित करा. नैवेद्य दाखवा. हा उपाय तन, मन आणि धन सर्व अडचणी दूर करु शकतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या शालिग्रामसंबंधीत काही उपाय...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

5. विष्णु पुराणानुसार ज्या घरात शालिग्राम असेल, ते घर तिर्था समान असते. 6. ब्रम्हवैवर्तपुराणाच्या प्रकृतिखंडामध्ये सांगितले आहे की, जेथे शालिग्रामची पूजा होते, तेथे विष्णुजीसोबतच महालक्ष्मी निवास करते.7. जो व्यक्ती शालिग्रामवर रोज जल अर्पण करतो. त्यांना अक्षय पुण्य प्राप्त होते. 8. शालिग्रामला अर्पित केलेले पंचामृत प्रसादाच्या रुपात सेवन केल्याने सर्व पापांपासून मुक्ति मिळते. 9. ज्या घरात रोज शालिग्रामची पूजा होते, तेथील सर्व दोष आणि नकारात्मकता नष्ट होते.

5. विष्णु पुराणानुसार ज्या घरात शालिग्राम असेल, ते घर तिर्था समान असते. 6. ब्रम्हवैवर्तपुराणाच्या प्रकृतिखंडामध्ये सांगितले आहे की, जेथे शालिग्रामची पूजा होते, तेथे विष्णुजीसोबतच महालक्ष्मी निवास करते.

7. जो व्यक्ती शालिग्रामवर रोज जल अर्पण करतो. त्यांना अक्षय पुण्य प्राप्त होते. 8. शालिग्रामला अर्पित केलेले पंचामृत प्रसादाच्या रुपात सेवन केल्याने सर्व पापांपासून मुक्ति मिळते. 9. ज्या घरात रोज शालिग्रामची पूजा होते, तेथील सर्व दोष आणि नकारात्मकता नष्ट होते.
X
COMMENT