आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकूनही घरामध्ये लक्ष्मीची अशी मूर्ती ठेवू नये, पैशांचे होत राहील नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवघरामध्ये कधीही महालक्ष्मीची उभ्या स्वरूपातील मूर्ती ठेवू नये. मान्यतेनुसार अशाप्रकारच्या मूर्तीची पूजा केल्याने घरामध्ये पैसा टिकत नाही. सेव्हिंगही नष्ट होते. कोलकाताच्या वास्तु विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार घरामध्ये देवी-देवतांची मूर्ती खरेदी करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा. चुकीच्या मूर्ती खरेदी करून त्यांची पूजा करत राहिल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.


1. घरामध्ये बसलेल्या हनुमान मूर्तीची पूजा करणे शुभ राहते. लक्षात ठेवा, हनुमानाची एकच मूर्ती घरात ठेवावी. यासोबतच घरात श्रीराम, सीता, लक्ष्मणाची मूर्ती ठेवणे शुभ राहते. हनुमानाची मूर्ती बेडरूममध्ये ठेवू नये.


2. भगवान श्रीगणेश, महालक्ष्मी आणि सरस्वतीची उभी मूर्ती कधीही ठेवू नये. यांच्या बसलेल्या स्वरूपातील मूर्तीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी कायम राहते.


3. राधा-कृष्णाची मूर्ती देवघरात एकत्र ठेवावी. ही मूर्ती तुम्ही बेडरूममध्येही ठेवू शकता.


4. देवघरात छोटेसे शिवलिंग ठेवावे, जास्त मोठे शिवलिंग घरासाठी शुभ राहत नाही. शिवलिंगासोबतच शिव कुटुंब म्हणजे देवी पार्वती, श्रीगणेश, कार्तिकेय स्वामी आणि नंदीची मूर्ती अवश्य ठेवावी.


5. घरामध्ये देवी-देवतांच्या मूर्ती असल्यास रोज सकाळी त्यांची पूजा करणे आवश्यक आहे. देवघराजवळ नेहमी स्वच्छता ठेवावी. यासोबत देवघरात अंधार राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.


पुढील स्लाईड्सवर पाहा व्हिडीओ...

बातम्या आणखी आहेत...