आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 शुभ योगात अधिक मासाची सुरुवात, उत्पन्न वाढवण्यासाठी करा या 6 पैकी कोणताही 1 उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 16 मेपासून अधिक मास सुरु झाला असून 13 जूनपर्यंत राहील. अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो. प्राचीन मान्यतेनुसार हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि या दिवसांमध्ये देवाची विशेष भक्ती केली जाते. विशेषतः भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची पूजा करण्यासाठी अधिक मासाचे विशेष महत्त्व आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बेवाला यांच्यानुसार अधिक मासाची सुरुवात पाच शुभ योगांनी होत आहे. बुधवार 16 मे रोजी, कृत्तिका नक्षत्र, गंड योग, पुष्य नक्षत्रासोबत उच्च राशीतील चंद्र राहील. या योगांमुळे अधिक मास आणखी जास्त खास झाला आहे. या योगामध्ये करण्यात आलेल्या पूजा-पाठाने अक्षय पुण्य प्राप्त होते.


1. अधिक मासात श्रद्धेनुसार रोज एखाद्या छोट्या मुलीला खीर खाऊ घालावी. रोज हे करणे शक्य नसल्यास प्रत्येक शुक्रवारी हे काम करावे.


2. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून एखाद्या राधा-कृष्ण मंदिरात जावे. श्रीकृष्णाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी.


3. रोज सकाळी स्नान केल्यानंतर दक्षिणावर्ती शंखामध्ये दूध, मध टाकून भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक करावा. बालगोपाळची पूजा करून लोणी-खडीसाखरचा नैवेद्य दाखवावा.


4. भगवान श्रीकृष्णाला पांढरी मिठाई, तांदुळाची खीर नैवेद्य दाखवावी. खिरमध्ये तुळस आणि खडीसाखर अवश्य टाकावी. साखर टाकू नये.


5. श्रीकृष्णाला पितांबरधारी म्हणतात. पितांबरधारी म्हणजे पिवळे वस्त्र धारण करणारे. यामुळे श्रीकृष्ण मंदिरात पिवळे वस्त्र, पिवळे फळ, धान्य अर्पण करावे.


6. एखाद्या मंदिरात केळीचे झाड लावावे. त्यानंतर रोज या झाडाची निगा राखावी. प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...