आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशात जाण्याची इच्छा असल्यास तुमच्या कामी येऊ शकतो हा उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांना विदेशात जाण्याची इच्छा असते, परंतु फार कमी लोकांची ही इच्छा पूर्ण होते. ज्योतिष शास्त्रानुसार विदेश यात्रेसाठी कुंडलीतील बारावे स्थान आणि राहूची शुभ-अशुभ स्थिती पाहिली जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत बारावे स्थान आणि राहू शुभ स्थितीमध्ये असेल त्यांना विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. ज्या लोकांच्या कुंडलीत हे दोन्ही अशुभ स्थितीमध्ये असतील त्यांनी येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होऊ शकतात.


उपाय - 
- 108 दिवस सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पाठ करावेत.

- पंचांगानुसार कोणत्याही मासातील शुक्ल पक्षातील मंगळवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचे पाठ करावेत. त्यानंतर सलग 108 दिवस रोज हे पाठ करावेत. यामध्ये खंड पडणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. हनुमान उपासनेने राहूचे दोष दूर होतात तसेच विदेश यात्रेमधील बाधा दूर होऊ शकतात.


राहू स्तोत्राचे पठण करावे...
राहूच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी राहू स्तोत्राचा जप करावा. रोज सकाळी पूजा केल्यानंतर 108 वेळेस या स्तोत्राचे पाठ करावेत.


राहु स्तोत्र
अस्य श्रीराहुस्तोत्रस्य वामदेव ऋषिः।
गायत्री छन्दः। राहुर्देवता। राहुप्रीत्यर्थं जपे विनियोगः॥
राहुर्दानव मन्त्री च सिंहिकाचित्तनन्दनः।
अर्धकायः सदाक्रोधी चन्द्रादित्यविमर्दनः॥1॥
रौद्रो रुद्रप्रियो दैत्यः स्वर्भानुर्भानुमीतिदः।
ग्रहराजः सुधापायी राकातिथ्यभिलाषुकः॥2॥
कालदृष्टिः कालरुपः श्रीकष्ठह्रदयाश्रयः।
विधुंतुदः सैंहिकेयो घोररुपो महाबलः॥3॥
ग्रहपीडाकरो द्रंष्टी रक्तनेत्रो महोदरः।
पञ्चविंशति नामानि स्मृत्वा राहुं सदा नरः॥4॥
यः पठेन्महती पीडा तस्य नश्यति केवलम्।
विरोग्यं पुत्रमतुलां श्रियं धान्यं पशूंस्तथा॥5॥
ददाति राहुस्तस्मै यः पठते स्तोत्रमुत्तमम्।
सततं पठते यस्तु जीवेद्वर्षशतं नरः॥6॥
॥इति श्रीस्कन्दपुराणे राहुस्तोत्रं संपूर्णम्॥


इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...