आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी नोकरी ते सेल्फ कॉन्फिडन्सपर्यंत सूर्य पूजेने होतात हे 7 फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये सूर्यदेवाला आत्मा मानण्यात आले आहे. यामुळे, जेव्हाही व्यक्तीमध्ये आत्मविश्वास कमी होतो, तेव्हा त्याला सूर्य उपासना करण्याचा सल्ला दिला जातो. सूर्य पूजेने विविध लाभ होतात. हे कलियुगातील साक्षात देवता आहेत. सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची उपासना विविध लाभ प्रदान करते. सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची सवय केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होऊ शकते. 


ज्योतिषाचार्य आर.के. शर्मा यांच्यानुसार कुंडलीत सूर्याची स्थिती अशुभ असल्यास व्यक्ती इतरांसमोर दाबून राहतो. स्वतःच्या हक्काविषयी बोलू शकत नाही आणि शासकीय कामामध्येही त्याला अडचणींना सामोरे जावे लागते. कुंडलीमध्ये सूर्यदेवाला मजबूत करण्याची इच्छा असल्यास सकाळी लवकर उठणे अत्यावश्यक आहे. उगवत्या सूर्यासोबत आपण अंथरुणाचा त्याग केल्यास सूर्य शुभफळ प्रदान करू लागतो.


सूर्य शुभ स्थितीमध्ये असल्यास व्यक्तीला जीवनात हे सात फायदे होतात...
1 - सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. कोणत्याही कामामध्ये आत्मविश्वास भरपूर राहतो. 
2 - डोक्यात वाईट विचार येत नाहीत. व्यक्ती नेहमी सकारात्मक विचार करतो.
3 - शासकीय कामामध्ये यश प्राप्त होते.
4 - सरकारी नोकरीत लाभाची स्थिती निर्माण होते.
5 - वडिलांवरचे प्रेम वाढते. वडिलांकडून मदत मिळते.
6 - ऑफिसमधील वातावरण तुमच्यासाठी ठीक राहते. ज्यामुळे धनलाभाचे योग जुळून येतात.
7 - वैवाहिक नात्यांमध्ये दुरावा येत नाही, घटस्फोटाचे योग नष्ट होतात.


पुढील स्लाईडवर वाचा, कशाप्रकारे करावे सूर्य उपासना...

बातम्या आणखी आहेत...