आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे घालताना खिशातून पैसे पडल्यास समजावा हा शुभ संकेत, वाचा इतरही शुभ संकेतांविषयी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक लोकांसोबत असे घडते की, कपडे घालताना खिशातून पैसे पडतात. तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे. परंतु ज्योतिषच्या शकुन-अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानले जाते. शकुन शास्त्र ज्योतिषमधील एक सहायक ग्रंथ मानला जातो. परंतु ज्योतिषाचार्य  प्रवीण के. त्रिवेदी यांच्यानुसार, आजकाल लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात परंतु आजही कुठे न कुजते या गोष्टींचे अस्तित्व आहे. या छोट्या-छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात. हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो. घरात किंवा घराजवळ अशा काही घटना घडतात, ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो. असेच काही संकेत आज आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.


खिशातून नाणे खाली पडणे : कपडे घालताना खिशातून नाणे पडणे हा शुभ संकेत आहे. तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते, यासाठी तयार राहावे.


घरातील नारळ आपोआप तडकणे : घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असली आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावे की, घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे. तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही.


घरामध्ये आपोआप तुळस उगवणे : तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर हा शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे.


आपोआप दुर्वा उगवणे : घरातील बागेमध्ये दुर्वा (श्रीगणेशाला अर्पण करण्यात येणारे एक गवत) उगवल्यास समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत.


घरामध्ये मध पडणे : घरामध्ये मधाचे भांडे फुटून मध फरशीवर पसरल्यास समजावे की, घरामध्ये आता कोणतीही निगेटिव्ह एनर्जी राहिलेली नाही. घरामध्ये एखादे मंगलकार्य होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...