आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज असतो 90 मिनिटांचा अशुभ काळ, या वेळेत करू नका खास काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, शुभ मुहूर्तामध्ये केले गेलेले कार्य शुभफळ प्रदान करते. त्याउलट एखादे शुभ कार्य मुहूर्त न पाहता केल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. राहू काळाला कोणत्याही शुभ कार्यासाठी योग्य मानले जात नाही. शुभ कार्य करण्यापूर्वी राहुकाळाचा अवश्य विचार करावा.


90 मिनिटांचा असतो राहुकाळ...
राहू काळाचे नाव सर्वांनीच ऐकले असेल परंतु फार कमी लोकांना राहुकाळ संदर्भात संपूर्ण माहिती असावी. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळामधील आठव्या भागाचा स्वामी राहू असतो. यालाच राहू काळ असे म्हणतात. प्रत्येक दिवशी ९० मिनिटांचा निश्चित राहू काळ असतो. ज्योतिष शास्त्रानुसार या काळात केले गेलेले कोणतेही कार्य, खरेदी-विक्रीचे व्यवहार शुभ मानले जात नाहीत.


राहू काळात करू नये शुभकार्य
ज्योतिष शास्त्रामध्ये राहुल छाया ग्रह मानले गेले आहे. पं. शर्मा यांच्यानुसार, राहू काळात सुरु केलेल्या कोणत्याही शुभ कार्यात विघ्न अवश्य येते. या काळात एखादा व्यवसाय सुरु केल्यास त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. या काळात खरेदी केलेले कोणतेही वाहन, घर, दागिने इतर वस्तू शुभफळ देत नाहीत. यामुळे कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी राहू काळाचा विचार अवश्य करावा. प्रत्येक ठिकाणी आणि ऋतुंमध्ये वेगवेगळ्या वेळी सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. यामुळे प्रत्येक भागातील राहू काळाची वेळ वेगवेगळी असते, परंतु खाली राहू काळाची स्टँडर्ड वेळ सांगितली आहे.


राहुकाळ कोणत्या दिवशी कोणत्या वेळेला असतो हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...