आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुटुंबात रोज कलह असल्यास सकाळी तुळशीसमोर करा हा एक उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळातील सर्वात मोठी समस्या म्हणजे घरातील कलह, वाद, गैरसमज आहे. तुमच्याकडे सर्व सुख-सुविधा असतील परंतु घरातील सदस्यांमध्ये नेहमी वाद होत असतील तर घर नरकासारखे वाटू लागते. रोर्ज-रोज होणारे वाद कोणालाही कमजोर करू शकतात. वेळेनुसार हे वादही वाढतच जातात. काहीवले भावांमध्ये तर काही वेळा पती-पत्नी, सासू-सुनेमध्ये वाद होत राहतात. तुम्हीही अशा कलहामुळे त्रस्त असाल तर येथे सांगण्यात आलेले उपाय तुम्हाला या अडचणीतून मुक्त करू शकतात.


- कुटुंबामध्ये दररोज वाद होत असल्यास घरातील महिलांनी रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीसमोर एक दिवा लावावा.


- सासू-सुनेचे पटत नसल्यास सुनेने पौर्णिमेच्या रात्री खीर बनवून चंद्र प्रकाशाखाली ठेवावी. ही खीर सासूला खाऊ  घालावी. यामुळे यांचा दुरावा कमी होऊ शकतो.


- एखाद्या महिलेचा सासरा तिच्यावर नाराज असल्यास त्या महिलेने रोज पाण्यामध्ये गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यास ही समस्या दूर होऊ शकते.


- एखाद्या महिलेचा पती जास्त रागीट असल्यास तिने या मंत्र (शांतम पापम)चा जप करावा. यामुळे पतीचा राग शांत होईल.


- घरामधील रोजचा कलह नष्ट करण्यासाठी गहू नेहमी शनिवारी दळावेत तसेच यामध्ये थोडेसे काळे हरभरे टाकावेत


- कुटुंबामध्ये सुख-शांती राहावी यासाठी विवाहित स्त्रीने रोज दुर्गा चालीसाचे पाठ करावेत.


- घरामध्ये आणलेली मिठाई सर्वात पहिले देवासमोर ठेवावी. त्यानंतर खावी. यामुळे कुटुंबातील प्रेम वाढते.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...