वर्षातील पहिले पुष्य / वर्षातील पहिले पुष्य नक्षत्र, करा धनलाभ करून देणारा 1 गुप्त उपाय

जीवन मंत्र डेस्क

Jan 02,2018 11:25:00 AM IST

वर्ष 2018 मधील पहिले पुष्य नक्षत्र 3 जानेवारी बुधवारी आहे. वर्षभर धनलाभ आणि फायदा मिळवण्यासाठी 2018 चे पहिले पुष्य नक्षत्र तुमच्यासाठी खास राहील. बुधवारी असल्यामुळे हे बुधपुष्य नावाने ओळखले जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार, पुष्य नक्षत्रामध्ये करण्यात आलेले उपाय खूप लवकर आणि दीर्घ काळापर्यंत शुभफळ प्रदान करतात. उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्‌ट यांच्यानुसार पुष्य नक्षत्र बुधवारी सकाळी 9 वाजता सुरु होईल आणि रात्रभर राहील.


ज्योतिष शास्त्रामध्ये 27 नक्षत्र सांगण्यात आले असून यामध्ये 8 व्या स्थानावर पुष्य नक्षत्र येते. शास्त्रामध्ये याचे महत्त्व जास्त सांगण्यात आले आहे. हे अत्यंत शुभ नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र स्थायी असल्यामुळे या काळात करण्यात आलेली खरेदी स्थायी आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी मानली जाते.


या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आणि अधिष्ठाता बृहस्पती देव आहेत. यामुळे पुष्य नक्षत्रामध्ये करण्यात आलेले काम शनीच्या प्रभावामुळे स्थायी स्वरूपात फायदा करून देते तर बृहस्पती देव त्या कामामुळे समृद्धी प्रदान करतात.


'पाणिनी संहिता'मध्ये "पुष्य सिद्धौ नक्षत्रे" विषयी लिहिण्यात आले आहे की..
सिध्यन्ति अस्मिन् सर्वाणि कार्याणि सिध्यः |
पुष्यन्ति अस्मिन् सर्वाणि कार्याणि इति पुष्य ||


अर्थ : पुष्य नक्षत्रामध्ये सुरु करण्यात आलेले सर्व कार्य पुष्टीदायक, सर्वथा सिद्ध होतातच. यामुळे वर्षभर फायदा मिळवण्यासाठी 3 जानेवारीला 1 गुप्त उपाय करावा. यामुळे तुम्हाला दीर्घकाळ फायदा आणि धनलाभ होईल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या दिवशी कोणता खास उपाय करावा...

- बुधवारी सूर्यास्ताच्या वेळी गणेश मंदिरात दुर्वा अर्पण कराव्यात.- श्रीगणेशाला 2 गुलाबाचे फुल अर्पण करावेत. यामधील एक फुल घरी घेऊन यावे.- पैसे ठेवण्याच्या ठिकाणी केशर-चंदनाने स्वस्तिक काढावे. - स्वस्तिकावर पिवळ्या कपड्यात गणेशाला अर्पण केलेले गुलाबाचे फुल ठेवावे.

- बुधवारी सूर्यास्ताच्या वेळी गणेश मंदिरात दुर्वा अर्पण कराव्यात.

- श्रीगणेशाला 2 गुलाबाचे फुल अर्पण करावेत. यामधील एक फुल घरी घेऊन यावे.

- पैसे ठेवण्याच्या ठिकाणी केशर-चंदनाने स्वस्तिक काढावे. - स्वस्तिकावर पिवळ्या कपड्यात गणेशाला अर्पण केलेले गुलाबाचे फुल ठेवावे.
X
COMMENT