आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनीचे रत्न आहे नीलम, धारण करण्यापूर्वी अवश्य जाणून घ्या, या 8 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी रत्न धारण केले जातात. शनीच्या अशुभ प्रभावापासून दूर राहण्यासाठी ज्योतिषी नीलम रत्न धारण करण्याचा सल्ला देतात. हे रत्न लवकर आपला प्रभाव दाखवते. काही लोकांना या रत्नाचे नकारात्मक फळंही प्राप्त होऊ शकतात. यामुळे तुम्हीही नीलम रत्न धारण करण्याच्या विचारात असाल तर येथे जाणून घ्या, या रत्नाशी संबंधित खास गोष्टी...


- नीलम रत्न धारण केल्यानंतर प्रभाव लगेच दिसू लागतो. परंतु हे रत्न तुम्हाला सकारत्मक फळ देणारे नसेल तर डोळ्यांची समस्या निर्माण होऊ शकते.

- नीलम रत्न तुमच्यासाठी योग्य न ठरल्यास एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. तुम्हाला मोठी जखम किंवा आर्थिक हानी होऊ शकते.

- नीलम रत्न धारण करणे तुमच्यासाठी अशुभ ठरल्यास याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवरही पडतो. सेव्हिंग नष्ट होऊ लागते.

- ज्या लोकांना नीलम रत्न धारण करणे अनुकूल ठरत नाही त्यांना रात्री वाईट स्वप्न पडतात. असे घडल्यास हे रत्न तुम्हाला अशुभ असल्याचे समजावे.

- ज्या लोकांसाठी नीलम रत्न शुभ आणि अनुकूल ठरते त्यांचे सर्व अपूर्ण काम पूर्ण होते. कामामध्ये सकारात्मक गोष्टी घडू लागतात.

- ज्या लोकांना नीलम रत्न धारण करणे शुभ ठरते त्यांचे खूप दिवसापासून चालू असलेले आजार बरे होतात आणि आराम मिळतो.

- नीलम रत्न शुभ ठरल्यास आर्थिक लाभ होऊ लागतात. नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होते. कुटुंबात सुख राहते.

- नीलम रत्न धारण केल्यानंतर तुमच्यावर आलेले संकट दूर झाल्यास आणि परिस्थितीमध्ये बदल दिसल्यास हा रत्न तुमच्यासाठी शुभ असल्याचे समजावे.

बातम्या आणखी आहेत...