आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापासून नोकरीपर्यंत 5 प्रकारे नुकसान करतो पितृ दोष, करू शकता हे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषमध्ये असे काही दोष सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे व्यक्तीला वाईट काळाला सामोरे जावे लागू शकते. यामधीलच एक दोष आहे पितृ दोष. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यावर राहूची दृष्टी पडत असेल किंवा सूर्य आणि राहू एकत्र असल्यास पितृदोष तयार होतो. कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार कुंडलीत राहू पाचव्या स्थानात असल्यास पितृ दोषाचा प्रभाव राहतो. यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होत राहतात आणि घरात अशांती राहते. येथे जाणून घ्या, पितृ दोषाचे खास संकेत, जे दैनंदिन आयुष्यात मिळतात...


1. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृ दोष असेल त्यांना जमीन-जायदाद, घर खरेदी-विक्रीमध्ये नुकसान सहन करावे लागू शकते. लग्न जमण्यात आणि नोकरीत अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


2. पुरुषाच्या कुंडलीत पितृ दोष असल्यास अपत्य सुख मिळण्यात अडचणी निर्माण होतात. पती-पत्नी निरोगी असले तरीही अपत्य प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होत राहतात.


3. घराच्या उत्तर-पूर्व किंवा पश्चिम-दक्षिण दिशेला शौचालय असल्यास पितृ दोष वाढतो.


4. पितृ दोषामुळे घरात धन असूनही कुटुंबात सुख-शांती राहत नाही. पती-पत्नीमध्ये वाद होत राहतात.


5. वास्तुनुसार दक्षिण आणि पश्चिम दिशेचा कोपरा म्हणजे नैऋत्य कोणा पितृ स्थान मानले गेले आहे. कुंडलीमध्ये पितृ दोष असल्यास या दिशेला नकारात्मकता राहते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, पितृ दोषसंदर्भात ज्योतिष काय सांगते आणि खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...