आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यातील सर्व चांगल्या-वाईट घटनांचे संकेत देतात हे 13 अंग, जाणून घ्या कसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्याचे शरीर इतर प्राण्यांच्या तुलनेत जास्त संवेदनशील असते. याच कारणामुळे भविष्यात घडणार्‍या घटनांचे संकेत आपले शरीर आपल्याला देत असते.


समुद्र शास्त्रानुसार शरीराचे अवयव फडकण्याचा संबंध भविष्याशी सांगण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीचा कोणता अवयव फडकत आहे, त्यावरून भविष्यात घडणार्‍या शुभ किंवा अशुभ घटनेचा अंदाज बांधला जाऊ शकतो. सध्याच्या काळामध्ये अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे फार कठीण आहे परंतु या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्षही केले जाऊ शकत नाही.


1. समुद्र शास्त्रानुसार, ज्या व्यक्तीची हनुवटी फडकत असेल त्याला स्त्री सुख मिळते. यासोबतच धनलाभ होण्याची शक्यता वाढते.
2. मस्तक (माथा) फडकल्याने भौतिक सुख (चांगले कपडे, खाणे-पिणे) प्राप्त होऊ शकते. कानपट्टी फडकल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात.
3. उजवा डोळा आणि भुवया फडकत असल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. डावा डोळा आणि भुवई फडकत असल्यास शुभ वार्ता समजते.
4. दोन्ही गाल फडकत असल्यास धन प्राप्ती होऊ शकते. चेहरा फडकत असल्यास मुलाकडून चांगली बातमी समजण्याचा संकेत आहे.
5. ओठ फडकत असल्यास जिवलग मीटर किंवा नातेवाईकाची भेट होणार असल्याचा संकेत समजावा.
6. उजव्या बाजूचा खांदा फडकत असल्यास धन-संपत्ती मिळण्याचे योग जुळून येतात. डावा खांदा फडकत असल्यास यश प्राप्त होते.
7. हात फडकत असल्यास व्यक्ती एखाद्या संकटात सापडू शकतो. हाताची बोटे फडकत असल्यास मित्रांची भेट होते.
8. उजव्या बाजूचा खांदा फडकल्यास धन आणि यश तसेच डाव्या बाजूचा फडकल्यास हरवलेली वस्तू मिळण्याचे योग जुळून येतात.
9. उजव्या हाताचा कोपरा फडकत असल्यास वाद होऊ शकतो. डाव्या हाताचा कोपरा फडकत असल्यास धन प्राप्ती शक्य आहे.
10. पाठ फडकत असल्यास वादामध्ये अडकण्याची शक्यता राहते. उजव्या बाजूची बगल फडकत असल्यास डोळ्याचे आजार होऊ शकतात.
11. बरगड्या फडकत असल्यास समस्या निर्माण होऊ शकते, छाती फडकत असल्यास मित्र भेटण्याचा संकेत आहे.
12. हृदयाच्या वरील भाग फडकत असल्यास भांडण होण्याची शक्यता राहते.
13. उजव्या पायाचा तळवा फडकत असल्यास अडचणी निर्माण होतात. डावा तळावा फडकत असल्यास प्रवासाचे योग जुळून येतात.


पुढील स्लाईड्सवर पाहा, ग्राफिक्स प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...