आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवार+एकादशी योगात भाग्योदयासाठी पाण्यामध्ये ही एक गोष्ट टाकून करावे स्नान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार, 12 एप्रिलला वरुथिनी एकादशी आहे. स्कंद पुराणातील वैष्णव खंडामध्ये एकादशी महात्म्य अध्याय आहे. या अध्यायात श्रीकृष्णाने वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीचे महत्त्व युधिष्ठिरला सांगितले आहे.  या अध्यायानुसार एकादशी व्रत आणि उपाय केल्यास भगवान विष्णू तसेच देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते. यासोबतच कुंडलीतील दोषही दूर केले जाऊ शकतात. या वर्षी गुरुवारी एकादशी आल्यामुळे हा दिवस आणखीनच शुभ झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारचा कारक ग्रह गुरु आहे. गुरु ग्रह भाग्य आणि धर्म कारक मानण्यात आला आहे. येथे जाणून घ्या, इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार एकादशी आणि गुरुवार योगात भाग्योदयाचे कोणते उपाय केले जाऊ शकतात.


स्नानाच्या पाण्यात टाकावी हळद
गुरुवार आणि एकादशी योगात सकाळी लवकर उठावे आणि स्नानाच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी. त्यानंतर  ऊँ नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करत स्नान करावे. स्नान केल्यानंतर केशराचा टिळा लावावा आणि केळीच्या झाडाला जल अर्पण करावे. त्यानंतर येथे सांगण्यात आलेले इतरही उपाय करावेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या दिवशी करण्यात येणारे इतर काही खास उपाय...

बातम्या आणखी आहेत...