आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, रात्री जन्मलेल्या लोकांच्या अशा गोष्टी, ज्या कोणीही सांगत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की, तुमच्या जन्माच्या वेळेवरूनसुद्धा तुमच्या स्वभाव आणि भविष्याविषयी बरेच काही समजू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार दिवसा जन्मलेल्या आणि रात्री जन्मलेल्या लोकांच्या स्वभावात वेगवेगळ्या गोष्टी  दिसून येतात. येथे जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार रात्री जन्म घेणाऱ्या लोकांच्या स्वभावाच्या खास गोष्टी...


1. ज्या लोकांचा रात्री जन्म झाला आहे, ते धाडसी असतात. या लोकांना धाडसी काम करणे आवडते.

2. हे लोक कोणतेही काम सुरु केल्यानंतर ते अपूर्ण सोडत नाहीत. काम पूर्ण होईपर्यंत कष्ट करत राहतात.

3. रात्री जन्म घेणाऱ्या लोकांमध्ये थोडाफार आळसही राहतो परंतु प्रत्येक काम जिद्दीने पूर्ण करतात.

4. हे लोक भावनेने नाही तर बुद्धीने विचार करून निर्णय घेतात. भाग्यावर नाही तर कर्मावर विश्वास ठेवणारे असतात.

5. हे लोक कोणत्याही कामामध्ये सहजासहजी हार मानत नाहीत. इतरांवर लवकर विश्वास ठेवत नाहीत. हे दृढ निश्चयी असतात.

6. ज्या लोकांचा जन्म रात्री झाला आहे, ते कमी बोलणारे असतात परंतु यांचे मन नेहमी अशांत राहते.

7. यांच्या स्वभावात रागही जास्त राहतो आणि यामुळे यांना छोट्या-छोट्या गाष्टींचा राग येतो.

8. या लोकांनी आरोग्याच्या बाबतीतही जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या लोकांनी कोणकोणते उपाय करावेत...

बातम्या आणखी आहेत...