आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोज या 5 पैकी करा कोणताही 1 उपाय, गर्भधारणेत येणाऱ्या अडचणी होतील दूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिलेची कुंडली पाहून तिला अपत्य सुख मिळणार की नाही याविषयी समजू शकते. अपत्य सुख मिळणार नसेल तर त्यामागे काय कारण आहे हेही समजू शकते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार महिलेच्या कुंडलीमध्ये वांझ योग असल्यास तिला अपत्य सुख सहजासहजी प्राप्त होत नाही. या योगामुळे महिलेला   लग्नानंतर विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


येथे जाणून घ्या, पं. शर्मा यांच्यानुसार कुंडलीत कसा तयार होतो वांझ योग? कुंडलीतील कोणत्या ग्रह स्थितीमुळे आई होण्यात अडचणी निर्माण होतात? अशा प्रकारच्या अशुभ योगांपासून दूर राहण्यासाठी कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात...


1. एखाद्या महिलेच्या कुंडलीत पाचव्या स्थानातील स्वामी सातव्या स्थानात आणि सप्तमेश म्हणजे सातव्या स्थानाचा स्वामी अशुभ ग्रहांसोबत असल्यास वांझ योग तयार होतो.


2. एखाद्या महिलेच्या कुंडलीतील पाचवे स्थान बुध ग्रहामुळे अशुभ झाले असेल किंवा कुंडलीतील सातव्या स्थानात शत्रू किंवा नीच राशीचा बुध स्थित असल्यास महिलेला अपत्य सुख प्राप्त करण्यात खूप अडचणी निर्माण होऊ शकतात.


3. एखाद्या महिलेच्या कुंडलीत पाचव्या स्थानात राहू असेल आणि त्यावर शनीची दृष्टी असेल, सातव्या स्थानावर मंगळ आणि केतूची दृष्टी असेल आणि शुक्र आठव्या स्थानाचा स्वामी असेल तर अपत्य जन्माला घालण्यात अडचणी निर्माण होतात.


4. एखाद्या महिलेच्या कुंडलीतील सातव्या स्थानात सूर्य किंवा शनी नीचेचा असल्यास अपत्य प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.


पुढे वाचा, पती-पत्नीने कोणते उपाय करावेत...

बातम्या आणखी आहेत...