आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mahesh Navami : या गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्यास दूर होऊ शकते दुर्भाग्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेष्ठ मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी (22 जून, शुक्रवार)ला महेश नवमी साजरी केली जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार या दिवशी शिवलिंगावर 5 गोष्टी - बिल्वपत्र, भांग, धोत्रा, जल आणि पंचामृत अर्पण केल्याने कोणत्याही व्यक्तीचे दुर्भाग्य दूर होऊ शकते. महादेवाला प्रसन्न करण्याचा हा खास दिवस आहे. मान्यतेनुसार या तिथीला महादेवाच्या आशीर्वादाने माहेश्वरी समाजाची उत्पत्ती झाली होती. याच कारणामुळे माहेश्वरी समाज हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.


महादेवाला प्रसन्न करण्यासाठी करा हे खास उपाय...
1. महेश नवमीच्या दिवशी 21 बेलाच्या पानांवर चंदनाने ऊं लिहावे आणि ही पाने महादेवाला अर्पण करावीत.
2. शिवपुराणानुसार महादेवाला धोतरा अर्पण केल्यास विशेष लाभ होतो.
3. महादेवाला भांग विशेष प्रिय आहे. भांग अर्पण केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होऊ शकते.
4. महेश नवमीच्या दिवशी शिवलिंगाला शुद्ध पाण्याने अभिषेक केल्यास आजारातून मुक्ती मिळू शकते.
5. शिवलिंगावर पंचामृत अर्पण केल्यास मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.
6. देवघरात रुद्र यंत्राची स्थापना करून दररोज याची विधिव्रत पूजा करावी.
7. धन लाभासाठी महादेवाला तांदूळ अर्पण करावेत. हा उपाय शिवपुराणात सांगण्यात आला आहे.
8. शिवपुराणानुसार शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी शिवलिंगाचा गायीच्या शुद्ध तुपाने अभिषेक करावा.
9. एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
मंत्र - ऊं त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌॥

बातम्या आणखी आहेत...