आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 2 ग्रहांमुळे बरबाद होते आयुष्‍य, जाणुन घ्‍या हे एकत्र आल्‍याने काय होते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंडलीतील मंगळ आणि राहुच्‍या अशुभ स्थितीमुळे तुम्‍ही अडचणीत येऊ शकता. या 2 ग्रहांच्‍या एकत्र येण्‍याने अशुभ योग बनतो. यामुळे भांडण, दुर्घटना, आर्थिक नुकसान, तणाव आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे 2 ग्रह ज्‍याच्‍या कुंडलीमध्‍ये असतात, तो फार त्रस्‍त तरी असतो किंवा फार यशस्‍वी होतो.


अंगारक योग बनवतात हे 2 ग्रह
कुंडलीतील कोणत्‍याही घरात राहु आणि मंगळ एकत्र आल्‍यास अंगारक योग बनतो. मंगळ उर्जेचा स्‍त्रोत आणि अग्नि तत्‍वाचा ग्रह आहे. तर राहु भ्रम आणि नकारात्‍मक भावनांचा ग्रह आहे. यामुळे दोन्‍ही ग्रह एकत्र आल्‍याने त्‍यांची शक्‍तीपूर्वीपेक्षा प्रचंड वाढते.

 

ज्‍योतिष शास्‍त्रामध्‍ये राहु आणि मंगळ ग्रहाच्‍या या अंगारक योगला लाल पुस्‍तकात पागल हत्‍ती आणि खवळलेल्‍या वाघाचे नाव देण्‍यात आले आहे. कुंडलीमध्‍ये हा योग असल्‍यास व्‍यक्‍ती आपल्‍या मेहनतीने नाव आणि पैसा कमवू शकतो. अशा व्‍यक्‍तींच्‍या जीवनात अनेक चढउतार येतात. हायोग चांगले आणि वाईट असे दोन्‍ही फळ देतो.


होऊ शकता हे वाईट परिणाम
अंगारक योगमुळे जातकाचा स्‍वभाव आक्रमक, हिंसक आणि नकारात्‍मक होतो. याच्‍या प्रभावामुळे जातकाचे आपल्‍या भावासोबत तसेच मित्र, नातेवाईकांसोबत संबंध खराब होऊ शकतात. काही वैदिक ज्‍योतिषी मानतात की, अंगारक योगमुळे व्‍यक्‍ती गुन्‍हेगार बनू शकतो व काही अवैध कामांमुळे तिला दिर्घकाळ तुरुंगवास भोगावा लागू शकतो. एखाद्या महिलेच्‍या कुंडलीमध्‍ये हे योग असल्‍यास पुत्रप्राप्‍तीमध्‍ये त्‍यांना अडचणी येऊ शकतात.

 

कुंडलीमध्‍ये हा योग असल्‍यास त्‍याची शांती केली गेली पाहिजे. नाहीतर दीर्घकाळापर्यंत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उज्‍जैन येथील अंगारेश्‍वर महादेव मंदिरामध्‍ये मंगळ-राहुच्‍या अंगारक योगची शांति करता येते.


काय होते अंगारक योगमुळे, जाणुन घ्‍या पुढील स्‍लाइडवर....

बातम्या आणखी आहेत...