आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 उपाय : धन लाभासाठी आज शुभ योगात महादेवाला अर्पण करा तांदूळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (11 जून) सोम प्रदोषचा अत्यंत शुभ दिवस जुळून येत आहे. हा योग अधिक मासात जुळून आल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार प्रदोष तिथीच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा आणि उपाय केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, या शुभ योगात कशाप्रकारे करावी शिव पूजा आणि उपाय...


व्रत आणि पूजन विधी
पाणी न पिता प्रदोष व्रत करावे. सकाळी स्नान केल्यानंतर शंकर-पार्वती आणि नंदीला पंचामृत, गंगाजलाने अभिषेक करावा. त्यानंतर बेलाचे पान, गंध, फुल, अक्षता, अर्पण करून धूप-दीप लावून नावैद्य दाखवून पूजा करावी. संध्याकाळी पुन्हा स्नान करून अशाच प्रकारे महादेवाची पूजा करावी. महादेवाला शुद्ध तूप आणि साखर मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आठ दिशांना आठ दिवे लावावेत. प्रत्येक दिवा लावल्यानंतर महादेवाला नमस्कार करावा. शिव स्तोत्र, मंत्राचा जप करावा. रात्री जागरण करावे. अशाप्रकारे सर्व इच्छापूर्ती आणि कष्टातून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत करणाऱ्या व्यक्तीने प्रदोष व्रताच्या धार्मिक विधानाचे नियम आणि संयमाने पालन करावे.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, शिव पुराणात सांगण्यात आलेले उपाय..

बातम्या आणखी आहेत...