प्रत्येक राशीसाठी खास / प्रत्येक राशीसाठी खास आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस

Jan 01,2018 12:02:00 AM IST

1 जानेवारी 2018 ला 3 शुभ योग जुळून येत असल्यामुळे प्रत्येक राशीसाठी हा दिवस चांगला राहील. सोमवारी मृगशिरा नावाचे नक्षत्र आनंद नावाचा शुभ योग तयार करत आहे. या व्यतिरिक्त सूर्य-चंद्र ब्रह्मा नावाचा योग तयार करत असून चंद्रावर गुरुची दृष्टी असल्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढचे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील वर्षाचा पहिला दिवस...

मेष - सार्वजनिक जिवनांत मान मिळेल. एखादी सुवार्ता कानी येण्याची शक्यता आहे. बेरोगारांना नोकरीचे कॉल्स येतील. अविचारीपणाने महत्वाचे निर्णय घेऊ नका. शुभ रंग: राखाडी, अंक-७वृषभ - दुकानदारांच्या गल्ल्यात वाढ होईल. हौसमौज करण्याकडे कल राहील. आज पैशाचे योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. शब्द जपून वापरा. शुभ रंग: गुलाबी, अंक-५.मिथुन - ऐकावे जनाचे, करावे मनाचे हेच धोरण ठेवणे गरजेचे. मोफत सल्लागार मंडळींना आजची अपाॅइंटमेन्ट देऊच नका. आज आपल्या आंतरमनाचा आवाज ऐका. शुभ रंग : पिस्ता, अंक-९.कर्क - कंजूषपणा बाजूला ठेऊन काही योग्य कामासाठी खर्च करावाच लागेल. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागावेसे वाटेल. दूरचे प्रवास कार्यसाधक होतील. शुभ रंग : डाळिंबी, अंक-३.सिंह - तुमच्या हातून एखदी उल्लेखनिय कामगिरी होईल. वेळेचा सदुपयोग केल्याने तुमच्या मेहेनतीस न्याय मिळेल. आर्थिक अडचणी काढता पाय घेतील. शुभ रंग : लाल, अंक-२.कन्या - व्यवसायात स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपली तत्व गुंडाळून ठेवून मागणी तसा पुरवठा या धोरणाने वागावे लागेल. नव्या कल्पना वेळीच आमलात आणा. शुभ रंग : हिरवा, अंक-१.तूळ - दैनंदीन व्यवहारात काही अडचणी निर्माण होतील. कामाचे तास वाढवावे लागतील. राजकारणात विरोधक वरचढ ठरतील. उपासनेची प्रचिती येईल. शुभ रंग : नारिंगी, अंक-६वृश्चिक - द्वीधा मन:स्थिती मुळे काही महत्वाचे निर्णय घेणे अवघड होईल. प्रेमी युगुलांच्या मार्गात अडचणी येतील. आज चिडचीड टाळून सुसंवाद साधणे गरजेचे. शुभ रंग : मोतिया, अंक-८.धनू - तुमच्या यशाचा स्पर्धकांना हेवा वाटेल. प्रिय व्यक्तीच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल. आज समाजसेवेच व्रत नको. स्वत:पुरतं बघा. प्रसन्न व आशादायी दिवस. शुभ रंग : चॉकलेटी, अंक-४.मकर - काहीजणांना जोडीदाराची नाराजी पत्करावी लागणार आहे. तब्येत नरम राहील. वादविवादात प्रसंगी नमते घेऊन आपला स्वार्थ साधून घेणे गरजेचे आहे. शुभ रंग : निळा, अंक-१.कुंभ - हौसेमौजेसाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. विलासी वृत्तीवर थोडसे नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. आज नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. शुभ रंग : पांढरा, अंक-२.मीन - मातुल घराण्याकडून काही शुभ बातम्या येतील. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. स्थावराच्या संदर्भातील काही महत्वाचे व्यवहार आज मार्गी लागतील. शुभ रंग :क्रिम, अंक-३.
X