Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | rashifal 2018 Aquarius horoscope kumbh rashi in marathi

वाचा, कुंभ राशीच्या लोकांसाठी कसे राहील नवीन वर्ष 2018

जीवन मंत्र डेस्क | Update - Jan 01, 2018, 12:02 AM IST

येथे जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती,

 • rashifal 2018 Aquarius horoscope kumbh rashi in marathi

  येथे जाणून घ्या, कुंभ राशीच्या लोकांना जॉब, बिझनेससाठी कसे राहील वर्ष 2018? या वर्षी कशी राहील तुमची आर्थिक स्थिती, लव्ह लाईफ, प्रॉपर्टी, करिअर आणि आरोग्यासाठी नवीन वर्ष कसे राहील तुमच्यासाठी. यासोबतच राशीनुसार कोणते उपाय करावेत हेही जाणून घ्या.


  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, संपूर्ण राशीफळ आणि उपाय...

 • rashifal 2018 Aquarius horoscope kumbh rashi in marathi

  जॉब आणि बिझनेस : या वर्षी कुंभ राशीतील नोकरी आणि व्यवसाय करणारे लोक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यात नोकरी करणा-या लोकांना यंदाचे वर्ष खास राहील. काही विशेष अचीवमेंट मिळवू शकतील. या वर्षात आपण कठोर मेहनत घेणार असून त्याचा परतावाही तुम्हाला मिळणार आहे. आपल्या कष्टाचे कौतूक होईल. नोकरीत प्रमोशन होईल आणि पगारवाढही होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळत राहील. या वर्षी तुम्ही सकारात्मक विचाराने काम करत राहणार आहात. ऑफिसमध्ये होणा-या वादापासून तुम्हाला दूर रहावे लागेल. या वर्षी तुमच्यावर नविन जबाबदारी येण्याची शक्यता आहे तसेच ती जबाबदारी तुम्ही यशस्वीरित्या हाताळू शकणार आहे. आपल्या क्षमतेत वाढ होईल. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा, काही छोटे-मोठे वाद ओढावण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला ऑफिसच्या निमित्ताने बाहेरगावी जाण्याचा योग आहे. वर्षाच्या सुरूवातीला महिने तुम्हाला थोडे संभाळून राहावे लागेल. संयमाने काम करा. अवघड कामे घाई- गडबडीत करू नका. इतर कमाईसाठी नवे काहीही करू नका त्यातून फार काही मिळण्याची शक्यता नाही. वर्षाच्या शेवटच्या काळात नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत सावध राहा. व्यवसाय करणारे लोक यंदा आपला बिजनेस वाढविण्यासाठी प्रयत्न करू शकतात. जुनी गुंतवणूक या कामासाठी उपयोगात आणता येईल. वर्षाच्या सुरूवातीला तीन महिने पार्टनरशिपमध्ये काम करू नका. त्यानंतर पुढील दोन महिन्यात तुम्हाला मोठे फायदे होऊ शकतात. बचत आणि उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. या काळात तुमची अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.

 • rashifal 2018 Aquarius horoscope kumbh rashi in marathi

  आर्थिक स्थिती : या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणा-या लोकांचे उत्पन्न वाढणार आहे. व्यवसाय करणा-या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. इतर इनकमाचे मार्ग सापडतील. पुरूषांना महिलांपासून तर महिलांना पुरूषांपासून (अपोजिट जेंडर) धनलाभ होऊ शकतो. कोणत्याही ठिकाणी तुम्ही पैसा लावला तरी त्यातून तुम्हाला फायदा होणार आहे. जुने कर्ज फेडणार आहात. बचत वाढविण्यासाठी इंटरनेट, म्यूचुअल फंड, प्रॉपर्टी, शेयर बाजार आणि कमोडिटी आदी ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्ही फायद्यात राहाल. कला, डिझायनिंग, फॅशन, आर्किटेक्ट आणि निर्यातीशी संबंधित लोकांना यंदा विशेष लाभ होईल. मात्र, बचत करण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागेल. मार्च ते जुलै या काळात आर्थिक नुकसान होण्याची चिन्हे आहेत. तर ऑक्टोबर महिन्यात तुमचे उत्पन्न कमी होईल. या काळात घाई-गडबडीत निर्णय घेऊ नका. या काळात कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या कोणी तुमची फसवणूक करू शकते.

 • rashifal 2018 Aquarius horoscope kumbh rashi in marathi

  कौटुंबिक स्थिती : या वर्षी आपले कौटुंबिक जीवन पहिल्यापेक्षा चांगले राहील आणि आयुष्य चांगले जाईल. जीवनसाथीकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. या वर्षी तुमच्या घरात शांती, समाधान राहील. त्यामुळे एखादे नवे काम सुरू शकता. घरातील मंडळींची पॉलिसी काढणे किंवा त्यांच्या नावावर गुंतवणूक करण्याचे नियोजन करू शकता. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल. घरातील लोकांशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा आवराव्या लागतील. यंदा तुम्ही मनापासून काम करणार आहात. या वर्षी 15 मार्चनंतर तुम्हाला काही कौटुंबिक समस्या निर्माण होतील. या काळात तुम्ही तुमचा राग नियंत्रणात ठेवा. कौटुंबिक काही निर्णय या काळात घेणे तुम्ही टाळा. वैवाहिक जीवनात काही काळाकरता तणाव निर्माण होऊ शकतो. या वर्षी काही कौटुंबिक वाद उदभवू शकतात. मात्र, तुम्ही त्यावर मात करू शकताल. काही कटू निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. शक्यतो असे निर्णय घेणे टाळा. हळू हळू मनातील घालमेल दूर होईल. कोणाच्या भानगडी सोडविण्याच्या नादात पडू नका, अंगलट येईल. यंदा तुम्ही घरातील मंडळी व मित्रांसमवेत फिरायला जाण्याची योजना बनवू शकता. वर्षाअखेर घरात एखादे लग्नसमारंभ किंवा पूजा-पाठ याचे आयोजन होऊ शकते. भाऊ-बहिणीचे सहकार्य मिळेल आणि चांगले नातेसंबंध राहतील. 

 • rashifal 2018 Aquarius horoscope kumbh rashi in marathi

  प्रेम आणि वैवाहिक आयुष्य :  लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्यात यंदा चढ- उतार येतील. आपल्याला समिश्र निकाल मिळतील. सुरूवातीच्या काळात पार्टनरसोबत मतभेद होऊ शकतात. या काळात आपल्या इच्छा दाबाव्या लागतील. एक- दुस-यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपला राग नियंत्रणात ठेवा. बोलण्याआधी दहा वेळा विचार करा. सुरूवातीच्या 3 महिन्याच्या काळात लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्याबाबत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. एप्रिलनंतर आपल्या नात्यात सकारात्मकता येईल. तुमचे प्रेम, नाते मजबूत होईल. लव्ह मॅरेज करणा-या लोकांनी सावधानता बाळगावी. वर्षाच्या सुरूवातीला लग्नासारखे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आई-वडिल व इतर नातेवाईक तुमच्या लग्नाला संमती देणार नाहीत. अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव या वर्षात मिळू शकतात. या राशीतील सिंगल लोक एखाद्या व्यक्तीचा विचार करत असतील किंवा रिलेशन सुरू करण्याचा विचार करत असतील तर त्या व्यक्तीला एप्रिल आणि मे महिन्यात प्रपोजल द्या.

 • rashifal 2018 Aquarius horoscope kumbh rashi in marathi

  आरोग्य : आरोग्याबाबतच्या बाबतीत तुम्हाला हे वर्ष ठीक- ठाक राहील. एखादा मोठा आजार किंवा त्रास होण्याची शक्यता नाही. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. जुनाट आजारापासून दिलासा मिळू शकते. मात्र, यंदा छोटी-मोठी दुखापत व आजरपण जरूर होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जे लोक आजारी आहेत त्यांनी हेल्दी रूटीनमधूनच मुक्तता मिळू शकते. या वर्षातील मधल्या सहा महिन्याच्या काळात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. चढ उतार येऊ शकतात. यंदा झोप कमी मिळू शकते आणि पोटाचे आजार उद्धभू शकतात. वाहन आणि मशिन चालवणा-या लोकांनी यंदा सावधानता बाळगावी. गर्भवती महिलांना यावर्षी पोट आणि ओटीपोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. मात्र, थोड्याच दिवसात तुम्हाला दिलासा मिळेल. हाडे आणि वाहिन्याशी संबंघित रोगाने त्रस्त लोकांनी सांभाळून राहावे. फास्ट फूड आणि मसालेदार जेवणापासून लांब राहा. 

 • rashifal 2018 Aquarius horoscope kumbh rashi in marathi

  उपाय-
  - मुंग्यांना पीठ टाका.
  - शनिवारी सायंकाळी उत्तर दिशेला मोहरीचे तेलाचा दिवा लावा. 

Trending